चुटकीसरशी Google Pay वर एकाधिक बँक अकाउंट ऍड करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Google Pay वर एकाधिक बँक खाती जोडा
अगदी चुटकीसरशी होईल हे काम
जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया
आजचं जग इतकं वेगवान झालंय की, त्यांना कुणालाही पैसे द्यायला फक्त एका सेकंदाचं उशीर लागतो. लोक कॅश न ठेवता त्यांच्या फोनवरून सहज पेमेंट करता. जर आपण UPI ऍप्सबद्दल बोललो तर काही वेळा आपल्याला काही समस्यांना सामोरे जावे लागते. असे बरेच लोक असतील ज्यांची दोन बँक खाती आहेत आणि त्यांच्या UPI ऍपमध्ये फक्त एक बँक खाते जोडले गेले आहे. आता त्याला त्याचे दुसरे खाते देखील जोडायचे आहे. तर, आज आम्ही तुम्हाला Google Pay वर एकाधिक बँक खाती कशी जोडायची ते सांगणार आहोत…
हे सुद्धा वाचा : iQOO Neo 7 5G: Dimensity 8200 प्रोसेसरसह पहिला फोन भारतात लाँच, बघा किंमत
Google Pay वर एकाधिक बँक अकाउंट ऍड करा :
– सर्व प्रथम तुम्हाला Google Pay ऍपवर जावे लागेल. नंतर वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तुमच्या फोटो आयकॉनवर टॅप करा. यानंतर तुम्हाला येथे Payment Methods मिळतील. त्यावर टॅप करा.
– आता येथे तुम्हाला तुमचे प्राथमिक बँक खाते दिसेल. त्याखाली Add Bank Account चा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. यानंतर तुम्हाला तुमची दुसरी बँक निवडावी लागेल.
– त्यानंतर तुम्हाला फोन नंबरसह तुमचे बँक खाते व्हेरिफाय करण्यास सांगितले जाईल. तुमच्या फोनवरून एक मॅसेज पाठवला जाईल.
– नंबर व्हेरिफाय केल्यानंतर, तुमचे बँक खाते यशस्वीरित्या जोडले जाईल.
मात्र, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमचे बँक खाते ज्या क्रमांकावर नोंदणीकृत आहे. तेच सिम तुमच्या फोनमध्ये असणे, आवश्यक आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile