ChatGPT करेल तुमच्या WhatsApp मॅसेजेसला रिप्लाय, कसे ते पहा ?

ChatGPT करेल तुमच्या WhatsApp मॅसेजेसला रिप्लाय, कसे ते पहा ?
HIGHLIGHTS

WhatsApp मध्ये ChatGPT इंटग्रेट करा.

संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप बघा

कंपनीने अधिकृतपणे रोल आउट केलेले नाही.

ChatGPT हा सध्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या स्मार्ट AI चॅटबॉटमुळे गुगल आणि मायक्रोसॉफ्टमधील स्पर्धा वाढली आहे. ChatGPT तुम्हाला माहीत असल्‍याच्‍या जवळपास सर्वच गोष्टींचे उत्तर देऊ शकते. एवढेच नाही तर तुमच्यासाठी व्हॉट्सऍप मेसेजला रिप्लायही करू शकते.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! कॉलिंगसह pTron ची नवीन स्मार्टवॉच लाँच, किंमत 1200 रुपयांपेक्षा कमी

तुम्हाला सर्व व्हॉट्सऍप मॅसेजना उत्तर देण्याची गरज नाही, कारण AI चॅटबॉट तुमच्यासाठी ते करेल. मात्र, ऍपमध्ये ChatGPT समाकलित करण्यासाठी WhatsApp ने कोणतेही अधिकृत समर्थन दिलेले नाही. वापरकर्ते ते थर्ड पार्टी ऍप्सद्वारे वापरू शकतात.

GitHub च्या मदतीने वापरकर्ते ChatGPT ला WhatsApp मध्ये इंटिग्रेट करू शकतात. त्याच्या डेव्हलपरने Python स्क्रिप्ट तयार केली आहे. यासाठी तुम्ही https://github.com/danielgross/whatsapp-gpt वर जाऊ शकता.

– या लिंकवर जाऊन तुम्हाला ZIP फाईल डाउनलोड करावी लागेल.
 
– टर्मिनल उघडा आणि WhatsApp-gpt-main फाईल निवडा.

– नंतर टर्मिनलवरून server.py प्रोग्राम रन करा.

– यानंतर Is टाका आणि proceed वर क्लिक करा.

– नंतर python server.py प्रविष्ट करा.

– तुमचा संपर्क क्रमांक आता OpenAI चॅट पेजवर आपोआप सेट केला जाईल.

आता “Verify I am a human” बॉक्सवर क्लिक करा.

– तुमच्या WhatsApp खात्यावर जा आणि तुम्हाला OpenAI ChatGPT मिळेल.

– ChatGPT तुमच्या WhatsApp मध्ये समाकलित आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुम्ही बॉटला प्रश्न विचारून तपासू शकता.

आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की, WhatsApp ने अद्याप हे AI इंटिग्रेशन अधिकृतपणे उपलब्ध करून दिलेले नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo