Moto G84 5G भारतात आज म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 ला लाँच करण्यात आला आहे. Motorola G सीरीजच्या या नवीन 5G फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. हा स्मार्टफोन स्टायलिश लूक आणि उत्कृष्ट कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये OIS सपोर्ट कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. कॅमेरामध्ये OIS चा रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त फायदा तुम्हाला पाहायला मिळेल. Moto G84 5G ची किंमत, उपलब्धता आणि सर्व तपशील जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.
Motorola ने हा नवीन 5G फोन भारतात 19,999 रुपयांना लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. हा फोन केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये आणण्यात आले आहे. पहिल्या सेलमध्ये, ICICI बँक कार्ड्सवर 1000 रुपयांची सूट मिळेल. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन्स Viva Magenta, Marshmallow Blue आणि Midnight Blue मध्ये लाँच करण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्याची विक्री 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा मिळेल. 50MP कॅमेरा कमी-रिझोल्यूशन कॅमेरापेक्षा अधिक डीटेल्ड कॅप्चर करू शकतो. 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आणि मॅक्रो व्हिजनसह 8MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. 16MP कॅमेरासह तुम्ही निश्चितच चांगले सेल्फी घेऊ शकता आणि सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनसह फोटो लो लाईटमध्ये स्पष्ट दिसतील.
Moto G84 5G मध्ये 6.55-इंच लांबीचा pLOED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले टिकाऊपणा आणि वर्सेटिलिटीच्या दृष्टीने फायदे देते. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 1300 nits आहे. Qualcomm snapdragon 695 5G प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 मध्ये अत्याधुनिक प्रोसेसिंग पॉवर, एन्हान्स AI कॅपॅबिलिटीज आणि प्रभावी 5G कनेक्टिव्हिटी मिळेल. ज्यामुळे अखंड मल्टीटास्किंग आणि सुरळीत गेमिंग परफॉर्मन्स मिळते.
हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. हे 14 5G बँडसह आणले गेले आहे. चांगल्या साउंड कॉलिटीसाठी यात डॉल्बी ATMOS सह स्टिरिओ स्पीकर आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 30W टर्बो पॉवर चार्जिंग सपोर्टसह येते. ही बॅटरी बेसिक कामे करताना संपूर्ण दोन दिवस टिकू शकते. याला वॉटर रेसिस्टंटसाठी IP54 रेटिंग मिळाली आहे. फोन Android 13 वर चालतो.