Amazon GIF Sale दरम्यान 50 इंच स्मार्ट TV वर भारी Discount उपलब्ध, पहा यादी

Updated on 09-Oct-2024
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट इंडियन सेलमध्ये स्मार्ट TV प्रचंड सूट उपलब्ध

नवीन मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करण्याची हीच योग्य संधी आहे.

Acer, Xiaomi इ. टॉप ब्रँड्सचे 50 इंच लांबीचे स्मार्ट TV यादीत समाविष्ट

Amazon च्या GIF Sale मध्ये जवळजवळ सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठ्या सवलती देण्यात येत आहेत. स्मार्टफोन, टॅब्स, फ्रिज आणि वॉशिंग मशीन इ. उपकरणे स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, यामध्ये वेगवेगळ्या स्क्रीन साईजचे स्मार्ट TV देखील समाविष्ट आहेत. जर तुमचा टीव्ही जुना झाला असेल आणि आता तुम्ही नवीन मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 50 इंच स्मार्ट TV वरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात यादी-

Acer Series 4K Ultra HD Smart LED Google TV

Acer च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 50-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याला डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट आहे. या TV ची किंमत 28,499 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 3000 रुपयांची बँक सवलत दिली जात आहे. तसेच, टीव्हीवर 1,382 रुपयांची EMI देखील उपलब्ध आहे. मनोरंजनासाठी, टीव्ही OTT ॲप आणि 16GB स्टोरेजसह प्रदान करण्यात आला आहे. येथून खरेदी करा.

Xiaomi X Pro 4K Smart Google TV

Xiaomi X Pro 4K Smart Google TV मध्ये 50 इंच डिस्प्ले आहे. त्याची किंमत 39,989 रुपये आहे. यावर 2000 रुपयांची बँक सूट आणि 1,939 रुपयांची EMI उपलब्ध आहे. त्याचा रीफ्रेश दर 60Hz आहे आणि रिझोल्यूशन 3840 x 2160 पिक्सेल आहे. या टीव्हीमध्ये ड्युअल बँड वायफाय, 3 HDMI, 2 USB, ऑप्टिकल, एव्ही आणि इथरनेट पोर्ट आहे. या टीव्हीमध्ये OTT ॲप्स, गुगल असिस्टंट आणि ऑटो लो-लेटेंसी मोडसह Google TV OS आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Toshiba 4K Ultra HD Smart QLED TV

Toshiba 4K Ultra HD Smart QLED TV ची किंमत 32,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 1250 रुपयांची बँक सूट आणि 1,600 रुपयांची EMI ऑफर दिली जात आहे. तुम्हाला या Toshiba TV मध्ये Amazon Alexa, व्हॉईस कंट्रोल, स्क्रीन मिरर, AirPlay आणि Dolby Atmos सारखे फीचर्स मिळतील. त्याबरोबरच, या टीव्हीमध्ये 3 HDMI, 2 USB पोर्ट आणि इनबिल्ट Wi-Fi देण्यात आला आहे. येथून खरेदी करा

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :