20 हजारांपेक्षा कमी किमतीत 43 इंच स्मार्ट TV खरेदी करा, मिळतोय बंपर डिस्काउंट

Updated on 23-Mar-2023
HIGHLIGHTS

Flipkart Electronics Sale सुरु झाला आहे.

या सेलमध्ये 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर्स दिल्या जात आहेत.

ONEPLUS, MI सारख्या ब्रँड्सच्या TV चा यादीत समावेश

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Flipkart Electronics Sale सुरू झाला आहे, जो 26 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान, स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीपर्यंत सर्वच गोष्टींवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. जर तुम्ही तुमच्या घरासाठी कमी किमतीत मोठा स्क्रीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या निवडक 43-इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही 20 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

हे सुद्धा वाचा : बजेट किमतीचा Nokia C12 आणखी स्वस्तात खरेदी करा, पालकांना भेट देण्यासाठी उत्तम पर्याय

OnePlus Y1S

OnePlus चा हा स्मार्ट टीव्ही Flipkart सेलमध्ये 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. SBI बँकेकडून या टीव्हीवर एकूण 2,750 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, टीव्हीवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. या ऑफर्स लागू झाल्यानंतर, टीव्हीची किंमत 2,249 रुपये असेल आणि जर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर लागू केली असेल, तर हा TV तुमहहला अतिशय स्वस्तात मिळणार आहे.  

Mi X

Mi चा हा स्मार्ट टीव्ही Flipkart वर 26,999 रुपये किमतीत उपलब्ध आहे. तुम्ही SBI बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास, तुम्हाला अतिरिक्त रु. 1250 सूटसह 1500 रुपयांची झटपट सूट मिळेल. यासोबतच 2000 रुपयांची अतिरिक्त सूटही मिळणार आहे. या ऑफर्स लागू झाल्यानंतर टीव्हीची किंमत 22,429 रुपये होईल. आता जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही यासोबत एक्सचेंज केलात तर तुम्ही Mi X 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. 

Thomson 9R Pro

Thomson 9R Pro 43 इंच स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर रु.18,999 च्या किमतीत उपलब्ध आहे. यावर SBI बँकेकडून 1500 आणि 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. EMI निवडण्यावर रु. 1000 ची सूट उपलब्ध आहे. इतकेच नाही तर, टीव्हीवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूटही दिली जात आहे. 

टीप : वरील सर्व ऑफर्सची तपशीलवार माहिती घेण्यासाठी तुम्ही इ-कॉमर्स साईट Flipkart ला भेट द्या. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :