Cheap Recharge Plans : 56 दिवसांच्या वैधतेसह 3 स्वस्त प्लॅन, होईल मोठी बचत…
56 दिवसांच्या वैधतेसह Airtel, Reliance Jio आणि Vi प्लॅन्स
बघुयात तिन्ही कंपन्यांचे 479 रुपयांचे प्लॅन
या प्लॅन्समध्ये दररोज मिळेल 1.5 GB डेटा
जर तुम्ही 56 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला 56 दिवसांच्या वैधतेसह Airtel, Reliance Jio आणि Vi कडे उपलब्ध असलेल्या 3 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
Jio चा 479 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज दिले जातात. तुम्हाला हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह मिळेल, म्हणजेच तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 84 GB डेटा मिळेल. जर तुमच्याकडे 5G फोन असेल आणि तुमच्या परिसरात Jio 5G असेल, तर तुम्ही या प्लॅनसह 5G स्पीडचा आनंद घेता येईल. या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचा मोफत ऍक्सेस मिळेल.
Airtel चा 479 रुपयांचा प्लॅन
Jio प्रमाणे, Airtel चा हा प्लॅन देखील आपल्या वापरकर्त्यांना त्याच 1.5 GB डेटासह दररोज 100 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा देतो. 56 दिवसांच्या वैधतेसह एकूण 84 GB डेटा आणि 3 महिन्यांसाठी अपोलो 24/7 सदस्यत्व, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक, विनामूल्य हॅलोट्यून आणि विनामूल्य विंकम्युझिक उपलब्ध असेल.
Vi चा 479 रुपयांचा प्लॅन
479 रुपयांचा प्लॅन Jio आणि Airtel सोबत नाही तर Vodafone Idea सोबतही आहे, या प्लॅनमध्ये 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित सर्फिंग आणि स्ट्रीमिंग सोबत दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. या व्यतिरिक्त, वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi Movies & TV आणि Data Delight देखील फायदे तुम्हाला मिळतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile