Jio 5G : या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू, ‘अशा’ प्रकारे मिळेल वेलकम ऑफर

Updated on 30-Dec-2022
HIGHLIGHTS

Jio 5G सेवा 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू

जर तुम्ही Jio 5G सक्षम क्षेत्रात असाल आणि तुमच्याकडे 5G फोन असेल, तर तुम्ही 5G सेवेसाठी पात्र आहात.

Jio ची 5G सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे किमान 239 रुपयांचा रिचार्ज असणे आवश्यक आहे.

रिलायन्स जिओ आपले 5G नेटवर्क सतत वाढवत आहे. कंपनीने अलीकडेच त्यांची 5G सेवा एकाच वेळी 11 शहरांमध्ये सुरू केली आहे. जिओने या यादीत आणखी दोन शहरांची नावे जोडली आहेत. Jio ने आपली 5G सेवा मध्य प्रदेशातील इंदूर आणि भोपाळमध्ये सुरू केली आहे. कंपनीने माहिती दिली की, मध्य प्रदेशातील युजर्सना 'जिओ वेलकम ऑफर'चे आमंत्रण दिले जात आहे.

या ऑफर अंतर्गत, वापरकर्ते 1Gbps पर्यंत 5G स्पीड विनामूल्य वापरण्यास सक्षम असतील. हे आमंत्रण केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. दोन दिवसांपूर्वी जिओने 11 नवीन शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली.

या शहरांमध्ये Jio 5G सेवा उपलब्ध

या यादीत लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरार आणि डेराबस्सी यांचा समावेश आहे. अशा प्रकारे जिओची सेवा दोन डझनहून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी, तुम्हाला गुजरातच्या सर्व 33 जिल्हा मुख्यालयांमध्ये Jio 5G ची सुविधा मिळेल. आता या यादीत इंदूर आणि भोपाळचीही नावे जोडली गेली आहेत.

सेवा विनामूल्य वापरण्याची संधी

Jio True 5G मध्ये यूजर्सना 4G पेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळेल. दूरसंचार ऑपरेटरने अद्याप 5G प्लॅन्सची स्वतंत्रपणे घोषणा केलेली नाही. कंपनी युजर्सना वेलकम ऑफर देत आहे. परंतु ही ऑफर केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

या ऑफर अंतर्गत यूजर्स 5G सेवा मोफत वापरू शकतात. जर तुम्ही Jio 5G सक्षम क्षेत्रात असाल आणि तुमच्याकडे 5G फोन असेल, तर तुम्ही 5G सेवेसाठी पात्र आहात. तुम्ही कंपनीच्या अधिकृत ऍप My Jio वर Jio वेलकम ऑफरसाठी नोंदणी देखील करू शकता.

तुम्हाला तुमच्या फोनवर My Jio ऍप ओपन करावे लागेल. यानंतर तुम्हाला जिओ वेलकम ऑफरचे बॅनर दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची आवड नोंदवू शकता. मात्र लक्षात घ्या की, Jio ची 5G सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे किमान 239 रुपयांचा रिचार्ज असणे आवश्यक आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :