भारती Airtel भारतातील ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह तीन प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि 84 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह येणारा प्लॅन शोधत असाल आणि त्यानंतर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नसेल, तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी आहेत. बघुयात यादी…
हे सुद्धा वाचा : Budget 2023 : मोबाईलपासून स्मार्ट टीव्ही स्वस्त होणार, सरकारकडून डिजिटल इंडियाला गिफ्ट
84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन शोधणाऱ्यांसाठी 455 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. Airtel च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स, 900 SMS आणि 6 GB डेटा 84 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. डेटा टॅरिफ कोटा पूर्ण झाल्यावर 50 पैसे प्रति MB दराने आकारला जाईल. या रिचार्जसह ग्राहकांना Apollo 24 by 7 चे अतिरिक्त फायदे, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक आणि तीन महिन्यांसाठी मोफत विंक म्युझिक देखील मिळतात.
जर तुम्ही डेटा वापरासह OTT फायदे शोधत असाल तर, तुम्ही Airtel च्या 719 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह जाऊ शकता. जो अमर्यादित लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स, 100SMS प्रति दिन आणि 1.5GB डेटा 84 दिवसांच्या वैधतेसह देतो. दैनिक डेटा संपल्यानंतर, डेटाचा वेग 64Kbps पर्यंत असेल. OTT बेनिफिट सेगमेंटमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar मोबाईल 3 महिन्यांसाठी आणि एअरटेल एक्सस्ट्रीम ऍप 84 दिवसांसाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतो.
या प्लॅनमध्ये रिवॉर्ड्समिनी सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी अपोलो 24 बाय 7, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक आणि विंक म्युझिक मोफत यांसारख्या इतर फायद्यांसह देखील येतो. एअरटेल थँक्स ऍपद्वारे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना ऍप एक्सक्लुझिव्ह मोफत 2GB डेटा कूपनचा आनंदही घेता येईल.
Airtel चा 839 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसारखे बेनिफिट्स मिळतील. शिवाय, यामध्ये तुम्हाला प्रतिदिन 2GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, डेटाचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. एअरटेल थँक्स ऍपद्वारे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना ऍप एक्सक्लुसिव्ह मोफत 2 GB डेटा कूपनचा आनंदही घेता येईल.