भारतात Airtel आणि Jio झपाट्याने 5G चा विस्तार करत आहेत. मात्र, सध्या युजर्स केवळ 4G प्लॅन्सचा लाभ घेत आहेत. आज आम्ही दोन्ही कंपन्यांच्या 1000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या प्लॅनमध्ये माहिती देणार आहोत. दोन्ही कंपन्या 999 रुपयांचा प्लॅन ऑफर करतात. चला दोन्ही प्लॅन्सचे डिटेल्स बघुयात-
JIOचा 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा मिळतो. म्हणजेच तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 292GB डेटा मिळेल. डेटा लिमिट पूर्ण झाल्यावर स्पीड 64kbps पर्यंत घसरतो. त्याबरोबरच, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळेल. याशिवाय, JIO TV, JIO CINEMA, JIO SECURITY आणि JIO CLOUD चे फ्री ऍक्सेस मिळेल.
5G क्षेत्रातील ग्राहक पात्र ग्राहकांना 5G नेटवर्कचा मानसोक्त लाभ घेता येईल.
AIRTEL चा 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील 84 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे 5G क्षेत्रातील ग्राहक पात्र ग्राहकांना 5G नेटवर्कचा मानसोक्त लाभ घेता येईल. त्याबरोबरच, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळेल.
याशिवाय, Amazon Prime मेंबरशिप 84 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. प्लॅनमध्ये रिवॉर्ड्स मिनी सब्स्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी Apolo 24/7चे ऍक्सेस, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकवर फ्री ऍक्सेस मिळेल.