अलीकडेच लाँच झालेला यू यूनिकॉर्न स्मार्टफोन मिडियाटेर हेलिओ P10 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा बजेट विभागातील दुसरा असा स्मार्टफोन आहे, ज्यात हेलिओ P10 प्रोसेसर मिळत आहे. मागील महिन्यात लाँच झालेल्या मिजू M3 नोट स्मार्टफोनमध्येही हेच प्रोसेसर देण्यात आले आहे. तथापि, दोन्ही स्मार्टफोन्स शाओमी रेडमी नोट 3 स्मार्टफोनचे प्रतिस्पर्धी मानले जात आहेत. मात्र असे सांगितले जात आहे की, हे दोन्ही स्मार्टफोन्स रेडमी नोट 3 ला कडक टक्कर देत आहेत. शाओमी रेडमी नोट 3 हा खरच एक आकर्षक स्मार्टफोन आहे. आणि कोणीही ह्याचाशी मुकाबला करु शकणार नाही ह्यात आपल्याला आकर्षक बॅटरी लाइफ सह आकर्षक फीचर्ससुद्धा मिळत आहे.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज असलेले अनेक स्मार्टफोन्स बाजारात आहेत आणि ते खूप उत्कृष्ट असल्याचेही सांगितले जात आहे. ह्यात नेक्सस 5X चा सुद्धा समावेश आहे. तथापि आम्ही यू यूनिकॉर्नपासून ह्याची सुरुवात करत आहोत. ह्या स्मार्टफोनची तुलना आपण शाओमी रेडमी नोट 3 सह करु शकता. चला तर मग माहित करुन घेऊय़ात कोणता स्मार्टफोन जास्त उत्कृष्ट आहे. येथे आपण ह्या शीटच्या माध्यमातून ह्याच्या स्पेक्सची तुलना करु शकता.
फ्लिपकार्टवर खरेदी करा शाओमी रेडमी नोट 3 ११,९९९ रुपयात
Yu Yunicorn | Xiaomi Redmi Note 3 | |
SoC | MediaTek Helio P10 | Qualcomm Snapdragon 650 |
Display Size | 5.5-inch | 5.5-inch |
Display Resolution | 1080p | 1080p |
RAM | 4GB | 2/3GB |
Storage | 32GB | 16/32GB |
Expandable Storage | Yes | Yes |
Rear Camera | 13MP | 16MP |
Front Camera | 5MP | 5MP |
Battery (mAh) | 4000 | 4000 |
OS | Android 5.1 | Android 5.1 |
येथे आम्ही ह्या दोघांवर केलेला Antut टेस्ट आणि स्कोर दाखवले आहेत.
(L to R) Yu Yunicorn, Xiaomi Redmi Note 3
येथे तुम्ही गीकबेंचचा स्कोर पाहू शकता.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मेटल बॉडीसह 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. हे दिसायला जवळपास सारखेच आहेत. त्याशिवाय ह्याचे डिझाईनही ठिकठाक आहे. त्याशिवाय फिंगरप्रिंट सेंसरची प्लेसमेंट आणि रियर स्पीकर्स वेगवेगळ्या ठिकाणी दिले आहेत.
Yu Yunicorn (in gold), Xiaomi Redmi Note 3 (in silver)
जर मिजू M3 नोट आणि यू यूनिकॉर्नविषयी सांगायचे झाले तर, ह्यात अनेक गोष्टी सारख्याच आहेत.
हेदेखील वाचा – १ जूनपासून ओपन सेलमध्ये मिळणार शाओमी रेडमी नोट 3
हेदेखील वाचा – लाँच आधीच करु शकता वनप्लस 3 स्मार्टफोनचा रिव्ह्यू