फेब्रुवारीमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यामध्ये अनेक दमदार स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. येत्या महिन्यात, Samsung Galaxy S23 सीरीज फोन व्यतिरिक्त OnePlus 11 देखील सादर केला जाईल. येथे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होणाऱ्या फोनची यादी मिळेल…
हे सुद्धा वाचा : खुशखबर ! कोट्यवधींना विकले पठानचे OTT राईट्स, लवकरच 'या' प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
Samsung Galaxy S23 सिरीज 1 फेब्रुवारी रोजी लाँच होईल. Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+ आणि Samsung Galaxy S23 Ultra या सिरीजमध्ये लाँच केले जातील. या सिरीजमध्ये पॉवरफुल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 चिपसेट दिला जाईल. रिपोर्टनुसार, यामध्ये 200-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
OnePlus 11 नुकताच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी हा फ्लॅगशिप फोन 7 फेब्रुवारीला भारत आणि इतर जागतिक बाजारात लाँच करेल. या हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
iQoo Neo 7 5G 16 फेब्रुवारी रोजी लाँच होईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसेट देण्यात आला आहे. ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने यासाठी मायक्रोसाइटही तयार केली आहे. यामध्ये तुम्हाला फोनबाबत सर्व माहिती मिळेल.
Xiaomi 13 सीरीज फेब्रुवारीमध्ये लाँच होऊ शकते. या सिरीजमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लॉन्च केले जातील. हा हँडसेट चीनमध्येही लाँच करण्यात आला आहे. त्याचे ग्लोबल व्हेरियंट आगामी मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केले जाईल.
या सिरीजमध्ये Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ लाँच केले जातील. या सीरिजमध्ये 120 watt फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाऊ शकते.
Oppo Reno 8T देखील पुढील महिन्यात लॉन्च होऊ शकतो. यामध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. याच्या मागील बाजूस 108-मेगापिक्सल कॅमेरा दिला जाऊ शकतो.