असे दोन स्मार्टफोन्स ज्यांचा तपशील सारखाच आहे, त्यामुळे त्यांची तुलना करणे खूप कठीण काम असते. यू यूटोपिया आणि वनप्लस 2 स्मार्टफोन्सनी ह्याच कारणांमुळे भारतीय ग्राहकांना मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे. यू यूटोपिया अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला गेला. यू यूटोपियामध्ये वनप्लस 2 प्रमाणे स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर दिला गेला आहे आणि ह्याची किंमत २४,९९९ रुपये आहे. त्यामुळे दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एकाला निवडले खूपच अवघड काम आहे.
चला, तर मग आम्ही तुम्हाला ह्यात मदत करतो. आम्ही येथे ह्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लूक, आकार आणि वजनाविषयी बोलत नाही, तर आमची तुलना ह्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा आणि कामगिरीवर आधारित आहे. ज्याच्या आधारे आपल्यापैकी काही ह्यातील १ स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
कामगिरी
यू यूटोपिया स्मार्टफोनच्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर व्यवस्थितरित्या ऑप्टीमाइज्ड केले गेले नाही. त्यामुळे ही हा स्मार्टफोन वनप्लस 2 पेेक्षा मागे पडतो. तथापि, दोन्ही स्मार्टफोन्सवर दररोजची कामे अगदी सहजपणे होतात. तसे दोन्हीही स्मार्टफोन्सच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक उणीवा आहेत, मात्र यू यूटोपियामध्ये थोड्या जास्तच आहेत. गेमिंग दरम्यान तर, दोन्ही स्मार्टफोन्समधले अंतर स्पष्ट दिसून येते. ह्याच कारणामुळे वनप्लस 2 खूप पुढे निघून जातो. वनप्लस 2 चे सॉफ्टवेअर व्यवस्थिरित्या ऑप्टीमाइज्ड केला आहे, त्याचबरोबर ह्याची GPU कामगिरीसुद्धा खूप चांगली आहे.
कॅमेरा
आम्ही ह्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमे-यामधून फोटो काढले आणि त्यांना एकत्र ठेवले आणि बघितले कोणत्या कॅमे-यामधून घेतलेले फोटो जास्त चांगले आले . आमच्या ह्या चाचणीत वनप्लस 2 विजेता बनला आहे. अगदी सहजपणे वनप्लस 2 ह्या चाचणीत यूटोपियाच्या पुढे राहिला. कमी प्रकाशातसुद्धा वनप्लस 2 ने काढलेले फोटो खूप चांगले येतात. वनप्लस २ चा फोकस खूपच चांगला आहे.
आपल्याला कोणाला निवडायचे आहे?
वनप्लस 2 स्मार्टफोन आमच्या मतानुसार यू यूटोपियापेक्षा जास्त चांगला आहे. वनप्लस 2 ची कामगिरी यू यूटोपिया स्मार्टफोनपेक्षा चांगली आहे. वनप्लस 2 चा कॅमेरासुद्धा यू यूटोपियाच्या कॅमे-यापेक्षा जास्त चांगला आहे. २४,९९९ रुपयाच्या किंमतीत वनप्लस 2 आमच्या मते चांगला स्मार्टफोन आहे. यूटोपियाचा फक्त डिस्प्लेच चांगला आहे.