Samsung 5G Phone : बेस्ट परफॉर्मन्ससह येणारे टॉप 5 स्मार्टफोन्स, मिळेल फोटोग्राफीचा उत्तम अनुभव

Updated on 30-May-2023
HIGHLIGHTS

Samsung चे टॉप 5 जबरदस्त 5G फोन्सची यादी

Samsung च्या फोनमध्ये तब्बल 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल.

Galaxy A54 5G मध्ये Exynos 1380 प्रोसेसर उपलब्ध आहे.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक कंपनी Samsung चे स्मार्टफोन्स भारतातील ग्राहकांमध्ये बरेच लोकप्रिय आहेत. कंपनी दरवर्षी लेटेस्ट फोन्स, फोन्स सिरीज अनोख्या फीचर्ससह लाँच करत असते. दरम्यान, आता 5G च्या काळात सॅमसंगने आतापर्यंत अनेक 5G फोन भारतात लाँच केले आहेत. आज आम्ही अशाच सर्वोत्तम 5 फोन्सची यादी तुमच्यासाठी तयार केली आहे. 

1. Samsung Galaxy A54 5G

Galaxy A54 5G Exynos 1380 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 6.4-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. तसेच, या डिव्हाइसमध्ये 50MP + 12MP + 5MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

2. Samsung Galaxy M14 5G

Galaxy M14 5G मध्ये 6.6-इंच लांबीचा PLS LCD डिस्प्ले आहे, जो 90 Hz रिफ्रेश रेटसह येतो. या फोनमध्ये Exynos 1330 चिपसेट प्रोसेसर आहे. याशिवाय, फोनमध्ये LED फ्लॅशसह 50MP + 2MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्याबरोबरच, समोरील बाजूस 13MP सेल्फी कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये 6000mAh बॅटरी आहे.

3. Samsung Galaxy A14 5G

या सॅमसंग फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा PLS LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा हँडसेट देखील Exynos 1330 चिपसेटसह येतो. यात तुम्हाला 4GB RAM मिळणार आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे, ज्याची बॅटरी 5000mAh आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी यात 50-मेगापिक्सेल ट्रिपल प्राइमरी कॅमेरा सिस्टम आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे.

4. Samsung Galaxy S23 Ultra 5G

 Galaxy S23 Ultra 5G फोन आकर्षक डिझाईनसह येतो. जो 120Hz डायनॅमिक AMOLED पॅनेल ऑफर करतो आणि त्याला Snapdragon 8 Gen 2 SoC मिळत आहे. फोनमध्ये तब्बल 200MP लेन्ससह क्वाड कॅमेरा सेटअपसह येतो. तसेच, फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

5. Samsung Galaxy F14 5G

हा फोन Exynos 1330 SoC आणि 4GB RAM ने सुसज्ज आहे. या डिव्हाइसमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह PLS LCD डिस्प्ले आहे. याशिवाय फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP + 2MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि LED सह 13MP फ्रंट कॅमेरा मिळतोय. त्याबरोबरच, फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :