आता तुमच्या डाटाचा वापर होणार ५०% कमी…कसे ते जाणून घ्या

Updated on 17-Nov-2015
HIGHLIGHTS

जर तुम्ही तुमचा डाटा लवकर संपण्याच्या समस्येने वैतागलात आहात, तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या काही सोप्या सेटिंग्सने आपण ह्याला ५० टक्क्यांपर्यंत कमी करु शकतो.

आजकाल जवळपास सर्वजण स्मार्टफोनचा वापर करताना दिसतात. जरी तो फोन नावाजलेल्या कंपनीचा असो किंवा अनोळखी कंपनीचा स्वस्त फोन असो. आणि स्मार्टफोन म्हटला की व्हॉट्सअप आणि सोशल मिडियाचा तितकाच वापर हा ओघाने आलाच. मात्र हे करत असताना आपला किती डाटा खर्च होतोय याची चिंताही आपल्याला लागलेली असते. हेच एक कारण आहे, ज्यामुळे तुम्ही आपल्या ऑफिस किंवा वायफाय झोनमध्ये असाल तेव्हा आपले डाउनलोडिंग करता. मात्र हेच जर एका महिन्याच्या रिचार्जवर पुर्ण महिना चालला तर मग किती बर होईल ना! चला तर मग जाणून घेऊयात असे काही खास उपाय जेणेकरुन आपण आपल्या डाटाचा वापर ५० टक्के कमी करु शकता.

 

१. जर तुम्ही क्रोम ब्राउझरचा वापर करत असाल, तर आपण ब्राउझरमध्ये डाटा सेवर मोडला निवडून ते कमी करु शकता. त्यासाठी तुमच्या क्रोम ब्राउझरला उघडा आणि आणि मग तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला ३ बिंदू दिसतील. त्यावर क्लिक करुन सेटिंगमध्ये डाटा सेवरवर क्लिक करा. त्याला निवडल्यावर आपला डाटा जवळपास  ५० टक्के कमी खर्च होईल.

२. गुगल सांगतो की, जर तुम्ही वरच्या बिंदूला फॉलो केलात, तर तुम्हाला स्वत:लाच जाणवेल की, तुमच्या डाटाची खपत कमी झाली आहे. त्याशिवाय अनेकदा आपल्या फोनमध्ये आपोआपच काही अॅप्स अपडेट होणे सुरु होतात. तुम्ही ते बंद करुनसुद्धा डाटा जतन करु शकतात.

३. ह्या अॅप्सना बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट पर्यायाची निवड करावी लागेल.आता ज्या अॅप्सला तुम्ही पसंत करता, ते सिंक न झाल्यास त्यावर टिकची जी खूण आहे ती हटवा. त्याचबरोबर बॅकग्राउंड डाटा बंद केल्यानेही डाटा सेव्ह करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

४. त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन डाटा यूसेजला निवडावे लागेल, त्यानंतर आपण ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ची निवड करा. असे केल्यानेसुद्धा तुमचा डाटा कमी खर्च हाेईल.

५. त्याशिवाय जर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये डाटाची लिमिट सेट केलात, तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आपण असे सेटिंगच्या ‘सेट सेल्युलर डाटा लिमिट’ वर जाऊन करु शकता. येथे तुम्हाला तुम्ही महिन्यात किती डाटा खर्च करु इच्छिता ते नमूद करायचे आहे. फक्त एवढच केल्याने आपल्याला आपल्या डाटा वापराची माहिती मिळत राहिल. जर तुम्ही हे महत्त्वपूर्ण उपाय अमलात आणले तर आपल्याला आपोआपच वाटायला लागेल की, आपल्या डाटाचा वापर कमी होतोय. त्यामुळे हे एकदा वापरुन पाहा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारालाही सांगा.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :