Samsung Galaxy S23 Ultra vs Galaxy S22 Ultra: सॅमसंगच्या दोन फ्लॅगशिप फोन्समध्ये जबरदस्त स्पर्धा

Updated on 13-Feb-2023
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 Ultra vs Galaxy S22 Ultra

कंपनीच्या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोमधील फरक

Galaxy S22 Ultraची किमंत जवळपास 90,000 रुपये

Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन अखेर लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या नवीन Galaxy S23 सिरीजमधील हा सर्वात परवडणारा हँडसेट आहे. Galaxy S23 Ultra च्या डिझाइनमध्ये Galaxy S22 Ultra ची झलक मिळते. नवीन S23 Ultra मध्ये पॉवरफुल प्रोसेसर, उत्तम कॅमेरा सिस्टम आणि डिस्प्ले सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. Galaxy S23 Ultra आणि Galaxy S22 Ultra मध्ये काय फरक आहे? या दोन्ही फोनच्या किंमती आणि फीचर्सबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

हे सुद्धा वाचा : Valentine Special : Whatsapp द्वारे तुमच्या भावना व्यक्त करा, बघा खास फीचर्स

डिस्प्ले :

Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन Galaxy S22 Ultra सारखाच दिसतो, पण त्यात काही बदल करण्यात आले आहेत. Galaxy S23 Ultra मध्ये मागील S22 Ultra पेक्षा अधिक फ्लॅट डिस्प्ले आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले आहे.

डिझाईन :

दोन्ही फ्लॅगशिप फोन मेटल फ्रेम आणि ग्लास सँडविच डिझाइनसह प्रीमियम लुकमध्ये आहेत. Galaxy S22 Ultra मध्ये फर्स्ट जनरेशन गोरिला ग्लास व्हिक्टस आहे तर Galaxy S23 Ultra मध्ये नवीनतम Gorilla Glass Victus 2 आहे. 

रॅम, स्टोरेज आणि चिपसेट

नवीन Galaxy S23 Ultra मध्ये 8 GB आणि 12 GB RAM सह 256 GB, 512 GB आणि 1 TB इनबिल्ट स्टोरेज पर्याय आहेत. नवीन गॅलेक्सी सीरिजच्या या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

त्याबरोबरच, Galaxy S22 Ultra मध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 आणि 12 GB रॅमसह 128 GB, 256 GB आणि 512 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे.

कॅमेरा :

Galaxy S23 Ultra आणि Galaxy S22 Ultra मध्ये मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Galaxy S23 Ultra मध्ये 200-मेगापिक्सेल प्राइमरी, 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 100x हायब्रिड झूमसह दोन 10-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहेत.

 Galaxy S22 Ultra मध्ये 108-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहेत.

बॅटरी :

Samsung Galaxy S23 Ultra आणि Galaxy S22 Ultra मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी जलद वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोनच्या बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध नाही. Samsung Galaxy S23 Ultra ला थोडी जास्त बॅटरी लाइफ मिळण्याची अपेक्षा आहे.

किंमत :

Galaxy S23 Ultra ची किंमत 1,24,999 रुपये आहे आणि Galaxy S22 Ultra पेक्षा जास्त महाग आहे. Galaxy S22 Ultra बद्दल बोलायचे तर हा फोन Amazon India वर जवळपास 90,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. Galaxy S23 अल्ट्रा स्मार्टफोन लॅव्हेंडर, ग्रीन, क्रीम आणि फँटम ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे तर S22 अल्ट्रा फँटम ब्लॅक, फँटम व्हाइट, ग्रीन आणि बरगंडी रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :