digit zero1 awards

Samsung Galaxy A54 Vs Samsung Galaxy A34: टॉप 5 लीक फीचर्समध्ये तुलना…

Samsung Galaxy A54 Vs Samsung Galaxy A34: टॉप 5 लीक फीचर्समध्ये तुलना…
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A54 मध्ये 6.4-इंचाचा sAMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.

Galaxy A34 MediaTek Dimensity 1080 chipset द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही फोन 5000mAh बॅटरीसह येऊ शकतात.

अलीकडेच, Samsung Galaxy A34 आणि Samsung Galaxy A54 चे CAD-आधारित रेंडर्स लीक झाले होते आणि आता आम्हाला इंटरनेटवर अधिक लीक स्पेक्स मिळाले आहेत. Samsung लवकरच Galaxy A34 आणि Galaxy A54 लाँच करणार आहे. S23 सीरीज लाँच केल्यानंतर सॅमसंगचे हे पुढील लॉन्चिंग असेल.

हे सुद्धा वाचा : AIRTEL ग्राहकांना झटका ! रिचार्ज प्लॅन्स महागतील, सुनील मित्तल यांनी दिला इशारा…

आमच्याकडे Samsung Galaxy A34 आणि Samsung Galaxy A54 चे डिझाइन, डिस्प्ले, परफॉर्मन्स, बॅटरी आणि  इतर फीचर्स आहेत. Galaxy A54 हा हाय-एंड मिड-रेंज फोन असेल, तर Galaxy A34 हा अधिक परवडणारा स्मार्टफोन असणार आहे.

SAMSUNG GALAXY A54 VS SAMSUNG GALAXY A34

डिझाईन : 

दोन्ही फोन  Samsung Galaxy S23 प्रमाणेच मागील बाजूस समान ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येण्याची अपेक्षा आहे. फोन्समध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि थिन बेझल्स असल्याचं म्हटलं जातं. Samsung Galaxy A34 मध्ये वॉटर-ड्रॉप नॉच असू शकतो, तर A54 पंच-होल कटआउटसह रोल आउट करू शकतो.

 रेंडर्सने उघड केले आहे की, दोन्ही फोनमध्ये उजव्या काठावर व्हॉल्यूम रॉकर्स आणि पॉवर बटण असू शकतात. लीक्सनुसार, यात ड्युअल सिम, NFC, OTG आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल.

डिस्प्ले :

Galaxy A54 मध्ये 2340 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंच sAMOLED फुल HD डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, डिस्प्ले पॅनल 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल, जो 60Hz मध्ये देखील बदलला जाऊ शकतो.

Galaxy A34 फोन 2340 x 1080 पिक्सेल्स रिझोल्यूशनसह 6.6-इंच फुल HD +  sAMOLED  डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो.

परफॉर्मन्स : 

Galaxy A54 ला Samsung च्या स्वतःच्या Exynos 1380 SoC द्वारे समर्थित केले जाऊ शकते, जे 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह पेयर केले जाऊ शकते.

दुसरीकडे, Galaxy A34 मध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेट 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेला असण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही फोन Android 13 वर आधारित नवीनतम OneUI 5.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतील.

बॅटरी : 

दोन्ही फोन 25-W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीद्वारे समर्थित असू शकतात.

कॅमेरा : 

Galaxy A54 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची अफवा आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 8MP मॅक्रो लेन्सचा समावेश असेल. 32MP सेल्फी शूटर असण्याचीही अफवा आहे.

Galaxy A34 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील दिला जाऊ शकतो ज्यामध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 5MP मॅक्रो लेन्स असतील. यात 32MP सेल्फी शूटर देखील असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo