OPPO आपल्या स्मार्टफोन्स मध्ये जगावेगळ्या म्हणजे यूनीक आणि कलात्मक फीचर्स घेऊन येण्यासाठी ओळखली जाते. आपले हे वैशिष्ट्ये कंपनी आपल्या आगामी फोन म्हणजे OPPO Reno2 मध्ये पण कायम ठेवणार आहे. हा मोबाईल फोन पण कलात्मक आणि यूनीक फीचर्स सह येणार आहे. याच वर्षी OPPO ने त्यांचा OPPO Reno 10x Zoom मोबाईल फोन लॉन्च केला होता, हा 10x हाइब्रिड झूम टेक्नॉलॉजी सह लॉन्च केला गेला आहे. याच्या माध्यमातून यूजर्स जास्त चांगले फोटो घेऊ शकतात.
आपल्या नवीन OPPO Reno2 स्मार्टफोन सह कंपनीने असे ध्येय ठेवले आहे कि ते स्मार्टफोन फोटोग्राफीला एक नवीन दृष्टिकोन देणार आहेत. या द्वारे स्मार्टफोन फोटोग्राफर्सना जास्त ऑप्शन पण मिळतील. तसेच या आगामी फोनच्या माध्यमातून फोटोग्राफी एका वेगळ्या स्थरावर घेऊन जात येईल. OPPO Reno2 मध्ये तुम्हाला फोटोग्राफी साठी सर्व गरजेचे हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर दिले जातील ज्यांची गरज सर्वात जास्त आहे. चला आता या मोबाईल फोन वर एक नजर टाकूया कि आपल्याला काय मिळतो, आपण सुरवात करू याच्या कॅमेऱ्यापासून.
OPPO Reno2 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक क्वाड-रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. याच्या नावावरूनच तुम्हाला समजले असेल कि या मोबाईल फोन मध्ये बॅक पॅनल वर तुम्हाला चार कॅमेरा मिळणार आहेत. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 48MP+13MP+8MP+2MP चा कॅमेरा सेटअप मिळणार आहे. OPPO नुसार या सेटअपची फोकल रेंज 16mm पासून 83mm इतकी असणार आहे. हि जास्तीती जास्त वापरली जाणारी रेंज म्हणता येईल. इतकेच नव्हे तर OPPO Reno2 स्मार्टफोन 20x डिजिटल पर्यंत झूम करू शकतो. यामुळे यूजर्सना खूप दूरवरून पण चांगले फोटो घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. यासाठी तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टच्या जवळ जाण्याची गरज नाही, हा याचा एक सर्वात मोठा फायदा म्हणता येईल.
OPPO Reno2 मधील चार कॅमेरे एक साथ मिळून खूप चांगले काम करतात पण हे वेगवेगळे पण वापरले गेले तरीही हे खूप खास आहेत. 48MP प्राइमरी सेंसर एक IMX586 Sony सेंसर आहे जो तुम्हाला F/1.7 अपर्चर लेंस सह मिळतो. इतकेच नव्हे तर यात तुम्हाला पिक्सेल बाईनिंग टेक्नॉलॉजी पण मिळत आहे, ज्या द्वारे तुम्ही चार पिक्सल एका लार्ज पिक्सेल मध्ये बदलू शकता. यामुळे लो-लाइट मध्ये शानदार फोटो घेता येतील. याव्यतिरिक्त जर 8MP सेंसर बद्दल बोलायचे झाले तर हि 116 डिग्री वाइड एंगल लेंस आहे, जिच्या द्वारे जास्त एरिया कवर केला जाऊ शकतो. हि तेव्हा जास्त उपयोगी पडते जेव्हा तुम्ही लँडस्केप पिक्चर इत्यादी क्लिक करता. तसेच 13MP सेंसरची चर्चा करायची झाल्यास तुम्हाला सांगू इच्छितो कि हि एक टेलीफोटो लेंस आहे जी तुम्हाला 5x हाइब्रिड झूम सह मिळते, जी जवळपास 20x डिजिटल झूम करण्याची ताकद देते. त्याचप्रमाणे 2MP चा मोनो सेंसर डेप्थ कॅप्चर करण्यास मदत करतो. यामुळे बोकेह इफेक्ट असलेले फोटो घेता येतील.
एकीकडे हार्डवेयरच्या माध्यमातून लो-लाइट फोटो सुधारतील तर सॉफ्टवेयरच्या माध्यमातून ते अजून चांगले करता येतील. OPPO Reno2 मोबाईल फोन एक अल्ट्रा नाईट मोड सह येतो, जो AI चा वापर करून तुमच्या फोटोची ब्राइटनेस आणि शार्पनेस सुधारतो. जेव्हा फोनला समजते कि एम्बिएंट लाइट 3 Lux पेक्षा कमी आहे, हा फोटो शार्प आणि ब्राइट करण्यासाठी अल्ट्रा नाईट मोडचा वापर करतो. तसेच OPPO असे म्हणत आहे कि फोनचा कॅमेरा एका फोटो मधून लोक आणि सीन इत्यादी मधील फरक ओळखु शकतो. त्यानंतर हा त्यांना वेगवेगळे प्रोसेस करतो, जेणेकरून इमेज जास्त नैसर्गिक वाटावी.
कोणत्याही स्मार्टफोनची डिजाईन सध्या खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, हे OPPO ला चांगलेच माहित आहे. OPPO Reno2 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.55-इंचाचा डायनामिक AMOLED डिस्प्ले मिळत आहे, जो खूपच कमी बेजल्स सह येतो. कंपनी म्हणजे OPPO म्हणत आहे कि याची स्क्रीन एका सिंगल पीस 3D कर्व्ड ग्लास पासून बनवण्यात आली. फोनची डिजाईन जास्त प्रभावी बनवण्यासाठी कंपनीने यात एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला आहे. यामुळे फिंगरप्रिंट सेंसर लपून राहतो, त्याची जेव्हा गरज असेल तेव्हाच तो नजरेस पडेल. त्याचप्रमाणे हा डिवाइस दोन वेगवेगळ्या रंगात येईल. OPPO Reno2 मोबाईल फोन ल्यूमिनस ब्लॅक आणि सनसेट पिंक रंगात सादर केला गेला आहे. तसेच OPPO Reno2 सीरीज मध्ये कंपनी अनेक रंग आणू शकते.
OPPO Reno2 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक अल्ट्रा स्टेडी विडियो स्टेबिलाइजेशन टेक्नॉलॉजी पण मिळत आहे. कंपनी असे सांगत आहे कि यात IMU चा समावेश आहे, जी हाई सॅम्पलिंग रेट आणि हल सेंसर सह येते, यात तुम्हाला EIS आणि OIS मिळतो. यामुळे फोटो मध्ये स्टेबिलिटी येते, ज्यामुळे हे ब्लर नाही होत. तसेच फोन मध्ये तुम्हाला 60fps फ्रेम रेट मिळतो, ज्यामुळे स्मूदर लूकिंग विडियो तुम्हाला मिळतात.
OPPO Reno2 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G ओक्टा-कोर प्रोसेसर मिळतो, ज्याचा क्लॉक स्पीड 2.2GHz आहे. या चिपसेट मध्ये तुम्हाला 4th जेन मल्टी-कोर क्वालकॉम AI इंजन मिळतो. फोन चांगला चालावा यासाठी फोन मध्ये 8GB चा रॅम मिळत आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला 256GB ची स्टोरेज पण मिळत आहे. गेमिंग साठी फोन मध्ये Game Boost 3.0 सह तुम्हाला Touch Boost 2.0 पण मिळतो, ज्यामुळे फोनचा टच एक्सपीरियंस चांगला केला जातो. तसेच फोन मध्ये एक Frame Boost 2.0 पण देण्यात आला आहे, ज्या द्वारे बॅटरीचा वापर पण कमी केला जातो.
एक स्मार्टफोन तोपर्यंत एक चांगला फोन आहे असे म्हणता येणार नाही जोपर्यंत यात तुम्हाला एक चांगली आणि मोठी बॅटरी मिळत नाही. फोनला कधीच चार्ज नाही करावे लागले तर किती बरे होईल ना, तुम्हाला पण असे वाटते का? OPPO Reno2 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सह एक 4000mAh ची क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. फास्ट चार्जिंगचा एक फायदा असा कि तुम्हाला तुमचा फोन चार्ज होण्यासाठी जास्त वाट बघावी लागणार नाही.
OPPO Reno सीरीज खूप नवीन आहे, यात तुम्हाला सर्वात खास फीचर्स मिळत आहेत, जे याला कलात्मक बनवण्यासोबतच जगावेगळे पण बनवतात. OPPO च्या फोन्स मध्ये तुम्हाला असेच काहीसे बघायला मिळते. Reno मध्ये आपल्याला 10x Hybrid Zoom पण बघायला मिळला. Reno2 सीरीज मध्ये तेच खूप पुढे गेले आहे, यात तुम्हाला एक खास कॅमेरा पण मिळतो, ज्या द्वारे तुम्ही क्रिएटिव शॉट्स घेऊ शकता. या कॅमेऱ्या द्वारे स्मार्टफोन फोटोग्राफीची नवी व्याख्या लिहिली जाणार आहे. हा मोबाईल फोन 28 ऑगस्ट, 2019 ला सर्वात आधी भारतात लॉन्च केला जाणार आहे. भारतानंतर जगभरात हा डिवाइस कधी लॉन्च केला जातो हे बघावे लागेल.
डिस्क्लेमर: हा लेख डिजिट ब्रँड डसॉल्यूशंस टीमने ओप्पो साठी लिहिला आहे.