Oneplus च्या टॉप 5 कॅमेरा फोन्सची यादी, फोटोग्राफीसाठी उत्तम फीचर्सने सुसज्ज

Oneplus च्या टॉप 5 कॅमेरा फोन्सची यादी, फोटोग्राफीसाठी उत्तम फीचर्सने सुसज्ज
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 3 Lite हा या यादीतील सर्वात स्वस्त फोन

कंपनीने OnePlus 11 कॅमेरासाठी Hasselblad सोबत भागीदारी केली आहे.

OnePlus Nord 2T मध्ये 50MP OIS मेन कॅमेरा आहे.

Oneplus चे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मागील काही वर्षांत कंपनीने हॅसलब्लाड सारख्या लोकप्रिय ब्रँडसह भागीदारी करून कॅमेरा सेक्शन सुधारला आहे. चला तर मग बघूयात OnePlus कॅमेरा प्रेमींसाठी कोणते सर्वोत्तम फोन ऑफर करते. 

OnePlus Nord 2T 

OnePlus Nord 2T हा एक उत्तम आणि परवडणारा पर्याय आहे. या फोनमध्ये 50MP OIS मुख्य कॅमेरासह 8MP अल्ट्रावाइड शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळत आहे, तर समोर 32MP सेल्फी क्लिकर देण्यात आला आहे. याशिवाय, फोनला 90Hz FHD + AMOLED स्क्रीन, MediaTek Dimensity 1300 SoC आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी मिळत आहे.

OnePlus Nord CE 3 Lite

OnePlus Nord CE 3 Lite हा या यादीतील सर्वात स्वस्त फोन आहे, परंतु त्याचा कॅमेरा सर्वोत्तम आहे. कारण या फोनमध्ये 2MP मॅक्रो मॉड्यूल आणि 2MP डेप्थ सेन्सरसह 108MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. हँडसेट Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. 

 OnePlus 11R 

 OnePlus 11R प्राथमिक कॅमेर्‍यासाठी मल्टी-डायरेक्शनल PDAF आणि OIS सपोर्टसह 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. उर्वरित सेन्सर्स 8MP अल्ट्रावाइड स्नॅपर आणि 2MP मॅक्रो मॉड्यूल आहेत. तर, फ्रंट कॅमेरा 16MP चा सेन्सर आहे. फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिप, AMOLED डिस्प्ले आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट यांचा समावेश आहे.

OnePlus 10 Pro 

 OnePlus 10 Pro मध्ये तुम्हाला 48MP OIS मेन कॅमेरा, 8MP OIS टेलिफोटो आणि 50MP अल्ट्रावाइड सेन्सर मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरल 1 चिपसेट, 80W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आणि Android 12 सॉफ्टवेअर आहे.

OnePlus 11 

कंपनीने OnePlus 11 कॅमेरासाठी Hasselblad सोबत भागीदारी केली आहे. स्मार्टफोनमध्ये 50MP OIS मुख्य कॅमेरा + 48MP अल्ट्रावाइड शूटर + 32MP पोर्ट्रेट टेलिफोटो 2x ऑप्टिकल झूम लेन्स असा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 16MPचा सेल्फी स्नॅपर देखील आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo