OnePlus 11 vs OnePlus 11R: या फोनला सर्वात खास बनवणारी टॉप 5 फीचर्स पहा

OnePlus 11 vs OnePlus 11R: या फोनला सर्वात खास बनवणारी टॉप 5 फीचर्स पहा
HIGHLIGHTS

OnePlus 11 हा हाय-एंड स्पेक्स आणि नवीन फीचर्ससह येतो.

OnePlus 11R चीनमध्ये OnePlus Ace 2 नावाने लॉन्च झाला होता

OnePlus 11 आणि OnePlus 11R मधील फरक जाणून घेऊया

OnePlus ने अखेर OnePlus 11 सिरीज लाँच केली आहे, ज्यात OnePlus 11 आणि अधिक परवडणारा फोन OnePlus 11R समाविष्ट आहे. OnePlus 11 हा हाय-एंड स्पेक्स आणि नवीन फीचर्ससह येतो. OnePlus 11R हा तोच फोन आहे, जो चीनमध्ये OnePlus Ace 2 नावाने लाँच झाला होता.

दोन्ही फोनमधील फरक जाणून घेऊया :

डिझाईन : 

OnePlus 11 आणि OnePlus 11R ची डिझाईन सारखीच आहे. दोन्ही फोनच्या मागील बाजूस सँडस्टोन बॅक फिनिश आहे. यामध्ये पंच-होल कटआउट आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागील बाजूस ऍल्युमिनियम फ्रेमला जोडलेला गोलाकार कॅमेरा बेट आहे. अलर्ट स्लाइडर या सिरीजसह परत आला आहे.

दोन फोनमधील एक फरक असा आहे की, OnePlus 11 मध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यात सेल्फी कॅमेरा आहे आणि OnePlus 11R मध्ये फ्रंट कॅमेरा मध्यभागी आहे.

परफॉर्मन्स : 

OnePlus 11 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरसह तीन स्टोरेज पर्यायांसह समर्थित आहे. फोन 12GB/256GB, 16GB/256GB आणि 16GB/512GB व्हेरिएंटमध्ये येतो. डिव्हाइस Android 13OS वर चालते आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो.

OnePlus 11R मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट 256GB 12GB, 256GB 16GB आणि 512GB 16GB स्टोरेज पर्यायांसह जोडलेले आहे. हे नवीन Android 13OS वर चालते आणि 100W जलद चार्जिंग सपोर्टसह समान 5000mAh बॅटरी देते.

डिस्प्ले :

OnePlus 11 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 1440 x 3216 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच कर्व LTPO3 AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे. डिस्प्ले डॉल्बी व्हिजनला देखील सपोर्ट करतो.

OnePlus 11R मध्ये 1240 x 2772 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच कर्व AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले HDR 10+, 1B रंग आणि 120Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो.

कॅमेरा : 

OnePlus 11 ला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ऑप्टिकल झूमसाठी 32-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि वाइड-एंगल शॉट्ससाठी 48-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

OnePlus 11R मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि क्लोज-अप शॉट्ससाठी 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. डिव्हाइसमध्ये 16-मेगापिक्सेल सेल्फी शूटर देखील आहे.

किंमत : 

OnePlus 11 च्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 56999 रुपये आणि 16GB/256GB व्हेरिएंटची किंमत 61,999 रुपये आहे. 

 OnePlus 11R च्या 8/128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 16/256GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo