Latest Smartphones under 30k: आजकाल सर्व स्मार्टफोन निर्माता कंपन्या मध्यम श्रेणीमध्ये अनेक भारी फीचर्ससह तसेच AI टेक्नॉलॉजीसह स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध करून देत आहेत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला बजेट रेंजच्या स्मार्टफोन्सपेक्षा अधिक क्षमतेने फीचर्स प्रदान केले जातात. तसेच, या फोनमध्ये तुम्हाला डिझाईन पासून ते कॅमेरापर्यंत सर्व फीचर्स अगदी प्रगत तंत्रज्ञानासह मिळतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 30 हजार रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. पहा यादी-
Also Read: 5100mAh बॅटरीसह नवा OPPO A3x 5G फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स
फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या OnePlus Nord सिरीजला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. OnePlus Nord 4 हा या सिरीजमधील लेटेस्ट स्मार्टफोन आहे. OnePlus Nord 4 च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे, फोनचा 12GB + 256GB व्हेरिएंट 35,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. फोनबद्दल अधिक माहितीसाठी OnePlus च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Nothing Phone (2a) Plus स्मार्टफोन भारतीय बाजारात अलीकडेच सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 7 ऑगस्टपासून भारतात सुरू होणार आहे. Nothing चे स्मार्टफोन्स युनिक ट्रान्सपरंट डिझाईनकरता ओळखले जातात. कंपनीच्या नव्या फोनमध्ये देखील ही आकर्षक डिझाईन दिली गेली आहे. Nothing Phone (2a) Plus दोन व्हेरिएंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फोनचा 8GB + 256GB मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे आणि 128GB + 256GB मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. फोनबद्दल अधिक माहितीसाठी Nothing च्या अधिकृत साईटला भेट द्या.
प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Realme चा Realme 13 Pro लेटेस्ट स्मार्टफोन देखील 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येतो. फोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर मोबाईलचा 8GB + 256 GB व्हेरिएंट 28,999 रुपयांना आणि 12GB + 256 GB व्हेरिएंट 31,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 50MP Sony LYT-600 OIS मुख्य सेन्सर मिळतो. फोनबद्दल अधिक माहितीसाठी Realme च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Motorola चा लेटेस्ट Motorola Edge 50 5G फोन मध्यम श्रेणीमध्ये भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. हा फोन उत्तम परफॉर्मन्ससाठी Snapdragon 7 Gen 1 AE चिपसेटसह सुसज्ज आहे. Motorola चा हा स्मार्टफोन 256GB स्टोरेजसह 8GB रॅमसह येतो. या 5G फोनची किंमत 27,999 रुपये आहे, ज्याची विक्री 8 ऑगस्टपासून सुरू होईल. फोटोग्राफीसाठी यात 50MP Sony LYT 700C मुख्य सेन्सर आहे. या फोनबद्दल अधिक माहितीसाठी Motorola च्या अधिकृत साईटला भेट द्या.