स्टायलिश लुकसह Infinix Note 30i नवा स्मार्टफोन लाँच, बघा टॉप 5 फीचर्स
Infinix Note 30i नवा स्मार्टफोन लाँच
फोन 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
Infinix Note 30i मध्ये आकर्षक सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
Infinix या महिन्यात अनेक Note 30-ब्रँडेड स्मार्टफोन्सची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. तर, आता Infinix Note 30i लाँच केले आहे. ही उपकरणे कंपनीच्या वेबसाइटवर सर्व फीचर्स आणि इमेजससह सूचीबद्ध आहेत. डिव्हाइसची किंमत आणि उपलब्धता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. पण महाल फीचर्सची माहिती नक्कीच मिळालेली आहे. चला तर बघुयात नव्या स्मार्टफोनचे टॉप 5 फीचर्स.
डिस्प्ले :
Infinix Note 30i मध्ये मध्यभागी पंच-होल कटआउटसह 6.6-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो.
परफॉर्मन्स :
Infinix Note 30i स्मार्टफोन Helio G85 चिपसेटसह येतो. जो 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह आहे. हे Android 13 वर आधारित XOS वर चालेल.
बॅटरी :
फोन 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 33W रॅपिड चार्जिंग सपोर्टसह येईल. विशेष म्हणजे या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
कॅमेरा :
Infinix Note 30i मध्ये आकर्षक सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच, 64MP प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस दोन इतर कॅमेरे आहेत. सुरक्षेसाठी यात साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. डिव्हाइस डस्ट आणि स्प्लॅश प्रतिरोधासाठी IP53-रेट केले आहे.
किंमत :
या फोनची किंमत आणि उपलब्धता अजूनही पडद्याआड आहे. मात्र, हा फोन तीन कलर व्हेरिएंट म्हणजेच ऑब्सिडियन ब्लॅक, व्हेरिएबल गोल्ड आणि इंप्रेशन ग्रीन या कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile