Google चा पहिला फोल्डेबल Pixel Fold लाँच, पहा टॉप फीचर्स

Updated on 11-May-2023
HIGHLIGHTS

Google Pixel Fold कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन

डिव्हाइसमध्ये दोन 8.3MP चे कॅमेरे आहेत.

फोनमध्ये 4,800mAh बॅटरी आहे, जी 30W चार्जिंगला सपोर्ट करते.

Google Pixel Fold कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन म्हणून I/O 2023 दरम्यान सादर करण्यात आला आहे. गुगलचा दावा आहे की, हा बाजारातील सर्वात थिन फोल्डेबल फोनपैकी एक आहे. हे स्मार्टफोन Galaxy Fold4 प्रमाणे डिझाइन केले गेले आहे आणि ते पुस्तकाप्रमाणे उघडते आणि बंद होते. Google Pixel ची किंमत USD 1,799 म्हणजेच अंदाजे रुपये 1,47,000 आहे.

डिस्प्ले :

Google Pixel Fold मध्ये 5.8-इंच कव्हर डिस्प्ले आणि 7.6-इंच लांबीची फ्लेक्सिबल स्क्रीन आहे. दोन्ही OLED पॅनेल आहेत, त्यासोबत 120Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

परफॉर्मन्स

Tensor G2 चिपसेट फोल्डेबल फोनमध्ये उपलब्ध आहे यामध्ये 12GB रॅम 256GB/512GB स्टोरेजसह मिळणार आहे. फोनमध्ये Android 13 मिलत आहे, परंतु वर्षाच्या अखेरीस Android 14 वर अपडेट केला जाईल.

बॅटरी

फोनमध्ये 4,800mAh बॅटरी आहे, जी 30W चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

डिव्हाइसमध्ये दोन 8.3MP चे कॅमेरे आहेत. तुम्हाला 48MP + 10.8MP + 10.8MP असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळत आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :