आयफोन स्थापनेपासून आतापर्यंत प्रीमियम घटकाच्या बाबतीत त्याने एक ट्रेंडसेट केला आहे. सध्याच्या त्याच्या नवव्या पुनरावृत्तीवर,आयफोनचा सध्याचा काळ हा अॅनड्रॉईड पॉवर डिवायसेसशी कडक स्पर्धा करणारा आहे,ज्यात स्मार्टफोन्स काही अंशी यशस्वीही झाले आहेत. त्यामुळे सध्या आयफोन 6S आणि 6S प्लस विरुद्ध खूप चांगले अॅनड्रॉईड स्मार्टफोन्स स्पर्धा करत आहे. आणि ते उत्कृष्ट कामगिरी आणि विशेष घटकांद्वारा ते आयफोनला पर्याय पाहत आहेत.
द गॅलेक्सीज
सॅमसंगने बरोबर अचूक वेळी बाजारात उत्कृष्ट असे सॅमसंग गॅलेक्सी S6 आणि गॅलेक्सी S6 एज आणले. त्यानंतर गॅलेक्सी S6 सीरिजला पुढे चालू ठेवण्यासाठी गॅलेक्सी S6 एज प्लसला आणले. गॅलेक्सी S6 च्या ह्या सीरिजने यशस्वीरित्या प्रीमियम बिल्ट गुणवत्ता, चांगली कामगिरी आणि उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरा या वैशिष्ट्यांमुळे उंच भरारी घेतली. ६४ जीबी अंतर्गत स्टोरेज असलेला हा सॅमसंग गॅलेक्सी S6 सध्या ४२,९९० रुपयाच्या किंमतीत मिळतो. त्याच्या तुलनेत आयफोन 6S (१६जीबी अंतर्गत स्टोरेज) बद्दल चर्चा केली असता, त्याची मूळ किंमत ६२,००० आहे. गॅलेक्सी S6 जरी कडक अटींवर सध्याच्या जनरेशनचा फ्लॅगशिप स्मार्टफोन नसला तरीही, तो अजूनही कामगिरी, उत्कृष्ट चित्राचा दर्जा, ऑडियो आणि गुणवत्ता सुधारणेच्या बाबतीत एक उत्कृष्ट डिव्हाईस आहे. त्यामुळे सध्याच्या फेस्टीव सिझनमध्ये हा आपल्याला कमी किंमतीत मिळतो.
त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ हा अजून एक पर्याय आहे. ५३,९०० रुपये किंमतीत येणारा हा सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ हा आयफोन 6S पेक्षा जवळपास १०,००० रुपये कमी किंमतीचा आहे.
एक्सपिरियाज
तर सोनीचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स एक्सपिरिया Z5 आणि एक्सपिरिया Z5 प्रीमियम हे भारतात येण्याच्या तयारीत आहेत. जरी त्याच्या किंमतीबाबत बोलले जात नसले तरीही, सोनीचा प्रीमियम स्मार्टफोन हा जवळपास ६०,००० रुपये किंमतीचा असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच एक्सपिरिया Z5 प्रीमियम हा जगातील पहिला 4k रिझोल्युशन डिस्प्ले पॅनल असलेला स्मार्टफोन असेल असेही सांगण्यात येतय. थोडक्यात सांगायचे म्हणजे, आयफोन 6S आणि 6S प्लस खरेदी करणे हे काही तुमच्यासाठी सक्तीचे नाही, कारण त्याच किंमतीत किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत तुम्हाला नवीन जनरेशन एक्सपिरिया स्मार्टफोन्स डिवाईस मिळत आहे, त्यामुळे तुम्ही थोडे दिवस वाट पाहणेच योग्य आहे असे आम्ही सांगू.
लुमियाज
मायक्रोसॉफ्टने हल्लीच त्याच्या एका कार्यक्रमात लुमिया ९५० आणि ९५०XL स्मार्टफोन्स लाँच केले. येथे परत एकदा लुमिया 950XL हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात तुमच्या फोनला गरम होण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यासाठी द्रवरुप थंड अशी यंत्रणा वापरण्यात आली आहे. तसेच फ्लॅगशिप लुमियामध्ये उत्कृष्ट कॅमेरा सेंसरमध्ये प्रख्यात असे पॅकिंग केले आहे.
त्यांचाच जुना आयफोन
आयफोन ६ जरी जुन्या जनरेशनचा असला तरीही, अजूनही तो सर्वात चांगली कामगिरी करणारा डिवाईस आहे. त्यात असलेला ८ मेगापिक्सेल कॅमेरा अजूनही चांगले फोटोग्राफ्स देतो. सध्या ह्या आयफोन6 ची किंमत ३६,९९० रुपये आहे. याचाच अर्थ तो आयफोन 6S प्लस मध्ये तब्बल २६ हजाराचा फरक आहे.