Valentine’s Day Sale : त्वरा करा ! Samsung, Xiaomi आणि IQOO फोन्सवर भारी सूट

Valentine’s Day Sale : त्वरा करा ! Samsung, Xiaomi आणि IQOO फोन्सवर भारी सूट
HIGHLIGHTS

व्हॅलेंटाइन डे निमित्त Amazonचा सेल

या सेलला Fab Phones Fest असे नाव दिले आहे.

सेलदरम्यान, Samsung, Xiaomi आणि IQOO इ. फोन्सवर प्रचंड सूट

Amazon ने आणखी एक सेल जाहीर केला आहे. Amazonचा हा सेल व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी सुरू करण्यात आला आहे, जो व्हॅलेंटाईन डेसोबतच संपेल. Amazon ने आपल्या सेलला Fab Phones Fest असे नाव दिले आहे. या सेलमध्ये, SBI Max क्रेडिट कार्डवर 10% सूट उपलब्ध आहे. याशिवाय फेडरल बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास 1,250 रुपयांची सूट मिळेल. या सेलमध्ये कोणते स्मार्टफोन स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया… 

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy S23 Ultra BMW M Edition लाँच, मूळ फोनपेक्षा आहे खूप वेगळा…

Samsung  

सॅमसंग फोनही या सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहेत. Samsung Galaxy M सीरीजचे फोन जसे की Galaxy M13, Galaxy M33 आणि Galaxy M04 अनुक्रमे रु. 8,699, रु. 13,999 आणि रु. 7,499 मध्ये खरेदी केले जाऊ शकतात. त्यांच्यासोबत बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत.

Xiaomi 

Amazon च्या या व्हॅलेंटाईन डे सेलमध्ये, Redmi 10 Power, Redmi 10A आणि Redmi A1 अनुक्रमे रु. 10,749, रु 7,862 आणि रु. 6,499 च्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळेल.

Realme 

realme 50i Prime आणि realme 50A Prime अनुक्रमे 6,299 आणि 8,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी असेल. तर Realme 50 5G रु. 12,999 मध्ये उपलब्ध आहे. यासोबत नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. यात 5000mAh बॅटरीसह 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे.

Oppo 

 Oppo A78 Amazon च्या या सेलमध्ये 17,100 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यात 5000mAh बॅटरीसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत. यासोबतच 6 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे.

iQOO  

 iQOO Z6 5G, iQOO Z6 Lite 5G आणि iQOO Neo 6 5G वर सेलमध्ये ऑफर्स उपलब्ध आहेत. हे फोन SBI च्या ऑफरसह अनुक्रमे 14,499 रुपये, 11,999 रुपये आणि 24,990 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo