ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India ने आपल्या प्राइम सदस्यांसाठी Prime Phones Party Sale आयोजित केला आहे. हा स्मार्टफोन सेल 4 फेब्रुवारीपासून सुरु झाला असून 8 फेब्रुवारीपर्यंत चालेल. या काळात प्राइम सदस्यांना Xiaomi, Samsung, Realme आणि iQOO सारख्या आघाडीच्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर 40 टक्के सूट मिळेल.
हे सुद्धा वाचा : WhatsApp वर येणार अप्रतिम फीचर! आता महत्त्वाचे मॅसेज शोधण्याची गरज नाही…
Amazon च्या जबरदस्त सेलमध्ये Xiaomi 12 स्मार्टफोन्स 47,499 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. यावर बंपर बँक ऑफर दिली जात आहे. तर, सेलमध्ये Xiaomi चे इतर फोन Redmi 11 prime 5G, Redmi K50i आणि Redmi 10 पॉवर अनुक्रमे रु. 12,634, रु. 21,849 आणि 10,829 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी असेल. या सर्व उपकरणांवर उत्तम ऑफर्सही दिल्या जात आहेत.
Samsung Galaxy M33 स्मार्टफोन 15,342 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि Galaxy M13 स्मार्टफोन 9,927 रुपयांमध्ये मोठ्या सेलमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही मोबाईल फोनवर मोठ्या सवलतीसह एक्सचेंज डील दिले जात आहेत. यासोबत सॅमसंग गॅलेक्सी M04 देखील सेलमध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.
प्राइम फोन्स पार्टी सेल दरम्यान, 18,999 रुपयांच्या किंमतीसह Oppo A78 एक्सचेंज ऑफर अंतर्गत 18,049 रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी करता येईल. या फोनवर नो-कॉस्ट EMI ते 1899 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. याशिवाय Oppo F21s Pro आणि त्याच्या 5G व्हर्जनवरही उत्तम ऑफर उपलब्ध आहेत.
Realme Narjo 50 स्मार्टफोन Amazon वर 11,999 रुपयांना आणि Narjo 50i प्राइम 7,999 रुपयांना विकला जात आहे. दोन्ही फोनवर बँक सवलत दिली जात आहे. तसेच, फोनवर परवडणारी EMI आणि बंपर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत.
iQOO 11 5G स्मार्टफोन सेलमध्ये स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. फोनवर 5000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. तसेच, डिव्हाइस स्वस्त EMI आणि मजबूत एक्सचेंज ऑफरसह ऑफर केले जात आहे. याशिवाय, iQOO Z6 Lite आणि Neo 6 स्मार्टफोन्स देखील Amazon च्या फोन पार्टी सेलमध्ये उत्तम ऑफर्ससह सूचीबद्ध आहेत.