बजेट रेंज ग्राहकांसाठी आज आम्ही काही तरी खास घेऊन आलो आहोत. या रिपोर्टमध्ये 8 किंवा 7 हजार रुपयांचे नाही तर फक्त 6 हजार रुपयाअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल आपण बघणार आहोत. या स्वस्त स्मार्टफोनमध्ये तुम्हाला काय-काय विशेष मिळेल ते बघुयात.
केवळ 5,999 रुपये किमतीत Redmi A2 फोन लाँच करण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 6.5 इंच HD+ आहे. याशिवाय फोन MediaTek Helio A36 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, 8MP रिअर आणि 5MP सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी उपलब्ध आहे.
Nokia C12 फोन Amazon वरून 5,699 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय, फोन Unisoc 9863A1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, 8MP रिअर आणि 5MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. फोन 3000mAh ची बॅटरी आहे.
Redmi A1 फोनची किंमत 5,699 रुपये आहे. फोनमध्ये 5.45-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. फोन SC9863a ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, 5MP रिअर आणि 2MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळत आहे.
2C फोनमध्ये मायक्रोमॅक्सची किंमत 5,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.52 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय, फोन Unisoc T610 प्रोसेसरने सुसज्ज आहे.फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळत आहे. फोटोग्राफीसाठी 8MP रिअर आणि 5MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.
Nokia C01 Plus 4G फोनची किंमत 5,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय फोन Unisoc 9863A1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 3000mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी 8MP रिअर आणि 5MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.