तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
ह्या अॅपद्वारा यूजर्सला स्पीड टेस्ट, सिग्नल स्ट्रेंथही पाठवता येते.
TRAI ने आपला अधिकृत इंटरनेट स्पीड टेस्ट अॅप लाँच केला आहे. ज्याचे नाव आहे MySpeed App. हा स्पीड अॅप iOS आणि अॅनड्रॉईड दोन्ही प्लेटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ह्या अॅपद्वारे आपण इंटरनेट कनेक्शनवर किती डाउनलोड आणि अपलोड करत आहात, ते समजते. ह्या अॅपद्वारा यूजर्सला स्पीड टेस्ट, सिग्नल स्ट्रेंथही पाठवता येते.
ब-याच कंपन्या सांगितलेल्या इंटरनेट पॅक मध्ये 3G कनेक्शनवर 2G सेवा देतात, अशा अनेक तक्रारी TRAI कडे येत होत्या. त्यामुळे त्या लक्षात घेऊन त्यावर तोडगा म्हणून TRAI ने MySpeed App आणला आहे. चला तर मग पाहूया कसा काम करतो हा अॅप…
हेदेखील वाचा – ३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स
हा अॅप वापरणे खूपच सोपे आहे. हा वापरताना अॅनड्रॉईड यूजर्सला थोडी अडचण येते, पण आयफोन 6 वर हा खूप चांगल्या पद्धतीने चालतो. जेव्हा आपण हा अॅप उघडता, तेव्हा ऑटोमॅटिकली आपण 3G/4G नेटवर्कशी कनेक्ट आहात की नाही, ते सांगतो.
ह्यात दिले गेलेले ‘Begin Test’ बटन दाबताच यूजर्सला स्पीड टेस्ट रिझल्ट मिळतो. ह्यात प्रिवाइस टेस्ट रिझल्ट पाहण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा- CG slate gamified लर्निंग टॅबलेट भारतात लाँच , किंमत ८,४९९ रुपये
हेदेखील वाचा- आता ४५ भाषांमध्ये ट्रान्सलेट करणार फेसबुकचे हे नवीन कंपोजर फिचर
Team Digit
Team Digit is made up of some of the most experienced and geekiest technology editors in India! View Full Profile