Google Chrome वरून डाउनलोड करण्यापूर्वी ‘ही’ सेटिंग ऑन करा…

Google Chrome वरून डाउनलोड करण्यापूर्वी ‘ही’ सेटिंग ऑन करा…
HIGHLIGHTS

Google Chrome मध्ये एक फिचर आहे, जे HTTP साइट शोधते आणि वापरकर्त्यांना त्याबद्दल माहिती देते.

Chrome ने या फिचरला ऑल्वेज युज सिक्योर कनेक्शन असे नाव दिले आहे.

हे फिचर वापरकर्त्यांसाठी असुरक्षित असलेल्या अशा वेबसाइटवरून डाउनलोड करण्याबद्दल चेतावणी देईल.

गुगल क्रोम ब्राउझर जगभरात वापरला जातो आणि बर्‍याचदा आपण येथे डाउनलोड देखील करतो. परंतु ते किती सुरक्षित आहे किंवा ते कसे सुरक्षित करावे हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? यामुळे, Google Chrome त्याच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेकडे आणि गोपनीयतेची काळजी घेतो. असुरक्षित डाउनलोडिंगबद्दल Google Chrome तुम्हाला सूचित करतो. म्हणजेच, तुम्ही HTTPS ऐवजी HTTP वेबसाइटवरून काही डाउनलोड केल्यास तुम्हाला ताबडतोब चेतावणी देतो. ताज्या अहवालानुसार, Google आपल्या ब्राउझरसाठी अशा फीचरवर काम करत आहे, जे अशा प्रकारच्या डाउनलोडला पूर्णपणे ब्लॉक करेल आणि वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता आणखी मजबूत होईल.

हे सुद्धा वाचा : POCO : फोन प्रेमींसाठी बजेटमध्ये एक नवीन पर्याय बाजारात दाखल, पहा डिटेल्स…

जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, HTTPS च्या इतक्या वर्षानंतरही अजूनही अनेक वेबसाइट्स आहेत, ज्या HTTP वरून स्थलांतरित झालेल्या नाहीत. Google Chrome मध्ये एक फिचर आहे, जे HTTP साइट शोधते आणि वापरकर्त्यांना त्याबद्दल माहिती देते.

दोन प्रोटोकॉलमधील फरक हा आहे की HTTPS सामान्य HTTP रिक्वेस्ट आणि रिऍक्शन एन्क्रिप्ट करण्यासाठी आणि त्या रिक्वेस्ट आणि रिऍक्शन्सला डिजिटल स्वरूपात साइन करण्यासाठी TLS (SSL) वापरते. परिणामी, HTTP पेक्षा HTTPS अधिक सुरक्षित आहे.

Chrome ने त्याला नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा असे नाव दिले आहे. जेव्हा हा पर्याय सक्षम केला जातो, तेव्हा ते आपोआप HTTPS वर नेव्हिगेशन स्विच करते आणि तुम्ही असमर्थित साइटला भेट देता तेव्हा तुम्हाला सूचित करते. लक्षात घ्या की, हे नवीन फिचर नाही ज्याचा आम्ही सुरुवातीला उल्लेख केला आहे. त्या फिचरवर अजूनही काम सुरु आहे. 

हे सेटिंग नेहमी चालू ठेवण्यासाठी, Chrome वर जा आणि सेटिंग्जवर जा आणि येथे प्रायव्हसी आणि सिक्योरिटीवर जा आणि त्यानंतर सिक्योरिटी वर जा. येथे ऑल्वेज युज सिक्योर कनेक्शनचे टॉगल ऑन करावे लागेल.

हे फिचर ऑन केल्यानंतर, ते आपोआप वेबसाइट HTTPS वर हलवेल. तसेच, वापरकर्त्यांसाठी असुरक्षित असलेल्या अशा वेबसाइटवरून डाउनलोड करण्याबद्दल चेतावणी देईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo