TED x Gateway 2015 मध्ये प्रवक्ते आणि त्यांच्या कल्पनांनी दिली आजच्या पिढीला प्रेरणा

TED x Gateway 2015 मध्ये प्रवक्ते आणि त्यांच्या कल्पनांनी दिली आजच्या पिढीला प्रेरणा
HIGHLIGHTS

TEDxGateway's च्या सहाव्या प्रकाशन सोहळ्यात आलेल्या शास्त्रज्ञ, निर्माते आणि नवनिर्माणकर्त्यांनी आपण जग बदलण्यासाठी किती सक्षम आहोत, याबाबत आपल्या कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही ह्या सोहळ्याचे साक्षीदार होतो याचा आम्हाला आनंद आहे.

'कल्पनांचा प्रसार करणारे माध्यम' म्हणून प्रसिद्ध असलेलल्या TED ला  डिजिटच्या अनुयायांना कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. जेथे जगातील आगामी नवनिर्मित, शास्त्रज्ञ, विचारवंत, कार्यकर्ते आणि प्रेरक एकत्रित येऊन आपला अद्वितीय दृष्टिकोन आणि कल्पना लोकांपुढे मांडतात.त्यामुळे ह्या कार्यक्रमाचे आयोजक जगातील कानाकोप-यातून सर्वोत्कृष्ट असे प्रवक्ते शोधून जे १,१०० पेक्षा जास्त असलेल्या लोकांना आपल्या कल्पना आणि नवनिर्माणाविषयी माहिती देऊ शकतात आणि लोकांच्या प्रश्नांचे समाधानकारक असे उत्तर देऊ शकतात.

जसे की नेहमीप्रमाणे, यंदाही TEDxGateway 2015 मध्ये असे काही प्रवक्ते आलेले जे सायन्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना आलेल्या अनुभवांविषयी भरभरुन बोलत होते.

रितू करिधल – ISRO शास्त्रज्ञ: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची विद्यार्थिनी आणि एरोस्पेस इंजिनीयरिंग केलेली रितू करिधल ही एक ISROमध्ये अवकाश शास्त्रज्ञ आहे, जेथे ती १८ माइलस्टोनची वर्ष आणि मोजणीसाठी काम करत आहे. जर आपल्याला मागील वर्षी यशस्वीरित्या लाँच झालेल्या मंगळयानाबाबत (Mars Orbiter Mission)स्मरण असेल आणि त्यावेळी देशातील प्रत्येक वर्तमानपत्रात

साडी घातलेल्या एका स्त्री-शास्त्रज्ञांचा फोटो झळकत होता हे लक्षात असेल, तर ती शास्त्रज्ञ म्हणजेच रितू करिधल. त्यामुळे ह्या कार्यक्रमात रितू करिधल यांनी मंगळयान मिशनमध्ये ऑपरेशन डायरेक्टर म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या टीमसोबत मिशन पुर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यात आलेल्या अडचणी प्रेक्षकांसोबत शेअर केले. त्यांचा हा अनुभव अवकाश संशोधनाचा करिअर म्हणून विचार करणा-या मुलांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

डॅनी कॅब्रेरा (BioBots चे संस्थापक): डॅनी हे जीवशास्त्र एकवटणे आणि ते संगणकीय करणे अशा BioBots च्या शोधमोहिमेवर होते. BioBots 3D प्रिंटरवर काम करण्यासाठी त्यांनी आपल्या बायोलॉजी PhD चा त्याग केला. त्यांचे स्वप्न होते की, 3D अवयव संशोधन आणि विकास ह्यांच्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवून त्याचा वापर केवळ स्वयंचलित म्हणून न होता एखादी वस्तू म्हणूनही व्हावा. TEDxGatewayच्या स्टेजवर बोलताना त्यांनी हा BioBots कसा कार्यान्वित होतो, ह्याविषयी माहिती दिली.

 

 

इरिक जू यून किम- Dot Brailler स्मार्टवॉच: अंध व्यक्तींना किंवा काही दृष्टीदोष असलेल्या व्यक्तीना सोयीस्कर पडेल असे तंत्रज्ञान बनविण्यासाठी आपण आतापर्यंत पुष्कळ कल्पना आणि प्रोडक्ट्स बघितले(ज्यातील काही मागील TEDx Gateway कार्यक्रमात होत्या). पण त्यातील कोणतेही इरिक जू यून कीमच्या Braille स्मार्टवॉच इतके लक्ष वेधू शकले नाही. हे २०१६ मध्ये लाँच होईल आणि ज्याची उप किंमत  US$ 500 असेल. पण त्यात त्यांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने काही अडचणी येऊ लागल्य. त्यामुळे त्यात थोडी सुधारणा करुन आणि नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आता त्याची किंमत डॉलर ३००० ते डॉलर १५,००० च्या दरम्यान असेल.(२ लाख ते १० लाखांपर्यंत) हे स्मार्टवॉच अशा अंध व्यक्तींच्या मनगटावर बांधल्यावर ते एखाद्या सर्वसामान्य घड्याळासारखे दिसेल .ह्यात चार Braille अक्षरे अॅडजेस्टेबल गतीसह देण्यासाठी मॅग्नेट आणि  पिन्सचा वापर केला आहे. ज्यामुळे वापरकर्ते त्यांना आलेले मेसेजेस वाचण्यासाठी आणि न केवळ स्मार्टफोनवर अॅप वापरण्यासाठी पण इतर डिवायसेसवर ब्लूटुथच्या माध्यमातून इतर डिवायसेसवर त्याचा वापर करण्यासाठी उपयोग होईल. त्याचबरोबर लवकरच ते Braille eBook Reader आणण्याची योजना बनवत आहे, ज्याची किंमत अमेरिकेसाठी १००० डॉलर असेल.

क्षितिज मरवाह-(Tesseract): हा भारतातील एक तरुण नवनिर्माता आहे. क्षिति मरवाह हा टेसरअॅक्ट इमेजिंगचा संस्थापक आहे. दिल्लीत IITचा इंजिनीयर विद्यार्थी असतानापासूनचा त्याचा प्रवास त्यांना सर्वांसमोर सांगितला. हा अनुभव भारतातील पदवीधर विद्यार्थ्यांशी संबधित असू शकतो. MIT Media Lab मध्ये असताना  त्याने 3D इमेजिंग आणि ३६० डिग्री व्हिडियो आणि इमेज कॅप्चर करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले, मेहनत केली. आणि त्या प्रयत्नांचे फळ म्हणजे टेसरअॅक्ट आहे. क्षितिजने ह्या कार्यक्रमात ३६० डिग्रीतील व्हिडियो कॅप्चर करण्याचा, स्मार्टफोन अॅपद्वारा नियंत्रण करण्याचा आणि त्याच्या स्क्रीनमधून HD दर्जाचा व्हिडियो देण्याचा लाइव डेमो त्यांनी दिला. हे प्रोडक्ट २०१६ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

हर्ष सोंग्रा-MyChildApp.in: ह्या अॅपचा हा निर्माणकर्ता आणि उद्योजक आहे, ज्याला १९ व्या वर्षापासून dyspraxia ह्या रोगाने ग्रासलेले आहे. हर्षने त्याचे वैयक्तिक खाते लोकांशी शेअर केले ज्यात त्याने जागरुकता आणि मर्यादित माहितीचा अभाव यामुळे त्याच्या पालकांनी नऊ वर्षांपुर्वी  त्याच्या रोगाचे निदान कसे केले ह्याबाबत माहिती दिली. त्यामुळे हा अनुभवच हर्षला “My Child App” विकसित करण्यासाठी उपयोगी ठरला. ज्या सिरिजच्या माध्यमातून असा विकार असलेल्या मुलांच्या पालकांना १ मिनिटांत हा रोगाची माहिती कळायला लागली. त्यांचा पुढचा प्रयत्न हा माय चाइल्ड अॅपचा विस्तार वाढवण्यासाठी त्यात जन्मापूर्वी आपल्याला काय काळजी घेता येईल हा असेल.

लुजेंद्र ओझा- (ग्रहावर पाणी असल्याचा शोध घेतला): नासापैकी कोणीही बिंदूूसुद्धा जोडलेले नसताना  मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे कसे शोधून काढले, याबाबत ओझाने माहिती दिली. त्याने एक नवीन तंत्रज्ञान बनवले, ज्याच्या माध्यमातून MRO ने आपण फोटोंचेविश्लेषण करु शकतो(Mars Reconnaissance Orbiter).

 

 

 

डॉ. कनव कहोल- स्वास्थ्य स्लॅट(Health tablet): आपल्या उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाला परवडणारे अशी औषधे उपलब्ध करुन देणे हे आपल्यासारख्या  भारतीयांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न आहे, असे डॉ. कनव यांचे म्हणणे आहे. डॉ. कहोल यांनीसुद्धा अरिझोना स्टेट यूनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे, जेथे उत्तम आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी, ह्याविषयी लोकांना माहिती दिली जाते. डॉ. कनव यांनी कार्यक्रमात त्यांच्या सहका-यासोबत स्वास्थ्य स्लॅट किंवा हेल्थ टॅबलेट दाखवले, आणि ह्या हेल्थकेअरविषयी तुम्ही कशी माहिती मिळवाल आणि डॉक्टरांकडून तुम्हाला कसे अलर्ट्स मिळतील,इतकच नव्हे तर, ग्रामीण भागात जेथे अनेकदा इंटरनेट कव्हरेज नसते अशा वेळी तुम्हाला SMS मधून कशी माहिती मिळेल, ह्याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वास्थ स्लॅटच्या माध्यमातून आपण ECGs आणि इतर मोठे ग्राफ्स आपण मेसेजमधून कसे शेअर करु शकतो, ह्याबाबतही माहिती दिली. खरंच, हा कौतुकास्पद असा प्रयत्न म्हणावे लागेल.

त्यामुळे आता आम्हाला उत्सुकता आहे ती, TEDxGateway 2016ची..

Jayesh Shinde

Jayesh Shinde

Executive Editor at Digit. Technology journalist since Jan 2008, with stints at Indiatimes.com and PCWorld.in. Enthusiastic dad, reluctant traveler, weekend gamer, LOTR nerd, pseudo bon vivant. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo