digit zero1 awards

OnePlus Cloud 11 : टॅबलेटपासून ते स्मार्टफोनपर्यंत एकाच वेळी 5 डिव्हाईस लाँच…

OnePlus Cloud 11 : टॅबलेटपासून ते स्मार्टफोनपर्यंत एकाच वेळी 5 डिव्हाईस लाँच…
HIGHLIGHTS

OnePlus Cloud 11 एकूण 5 डिव्हाईस सादर केले.

OnePlus 11 व्यतिरिक्त, कंपनीने OnePlus 11R, OnePlus TV 65 Q2 Pro आणि OnePlus Buds Pro 2 लॉन्च केले आहेत.

OnePlus 11 5G ची प्री-बुकिंग सुरु

चीनी टेक कंपनी OnePlus ने मेगा लाँच इव्हेंटमध्ये पाच नवीन डिवाइस लाँच केले आहेत. फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 व्यतिरिक्त, कंपनीने OnePlus 11R, OnePlus TV 65 Q2 Pro आणि OnePlus Buds Pro 2 लॉन्च केले आहेत. दिग्गज इलेक्ट्रॉनिक गॅझेट निर्मात्याने प्रथमच एक टॅबलेट OnePlus Pad सादर केला आहे, जो Apple iPad शी थेट  स्पर्धा करेल. 

हे सुद्धा वाचा : खुशखबर ! VI युजर्ससाठी 'या' स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध होणार

OnePlus 11 5G: 

OnePlus 11 हा फ्लॅगशिप फोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 56,999 रुपये आहे, तर 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 61,999 रुपये आहे. यूजर्स हा फोन प्री-बुक करू शकतात. नवीन फोन सर्वात पावरफुल प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटच्या समर्थनासह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 3री जनरेशन हॅसलब्लॅड कॅमेराने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 50MP+48MP+32MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. नवीनतम स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू आहे. 

OnePlus 11R 5G:

 चिनी कंपनीने OnePlus 11R देखील लॉन्च केला आहे. यात सोनिक ब्लॅक आणि गॅलेक्टिक सिल्व्हर कलर पर्याय मिळतील. त्याच वेळी, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 16 RAM प्लस RAM Vita चा सपोर्ट सारखे फायदे देखील दिले गेले आहेत. त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. वापरकर्ते 21 फेब्रुवारीपासून ते प्री-बुक करू शकतात.

OnePlus TV 65 Q2 Pro:

 OnePlus चा नवीन स्मार्ट टीव्ही 99,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. 65-इंचाच्या QLED 4K स्मार्ट टीव्हीमध्ये ब्लु LED बॅकलाइटसह फ्लॅगशिप-स्तरीय QLED पॅनेल आणि 97 टक्के DCI-P3 सारखी वैशिष्ट्ये असतील. याशिवाय, याला 120Hz रिफ्रेश रेट आणि टॉप-शेल्फ हार्डवेअरचा सपोर्ट मिळेल. OnePlus चा नवीन टीव्ही Google TV वर चालेल आणि त्याची प्री-बुकिंग 6 मार्चपासून सुरू होईल.

OnePlus Buds Pro 2: 

OnePlus ने Dynaudio च्या सहकार्याने नवीन इयरबड लाँच केले आहेत. नवीन इअरबड्समध्ये आर्बर ग्रीन, ऑब्सिडियन ब्लॅक आणि मिस्टी व्हाईट रंगाचे पर्याय उपलब्ध असतील. त्याची किंमत 11,999 रुपये आहे, तर भारतीय बाजारासाठी विशेष 2R आवृत्ती 9,999 रुपयांना लॉन्च करण्यात आली आहे.

OnePlus Pad: 

OnePlus ने आज भारतात आपला पहिला टॅबलेट OnePlus Pad सादर केला आहे. त्याची स्क्रीन साईज 11.6 इंच आहे. हा टॅबलेट वनप्लसच्या विविध उपकरणांशी कनेक्ट करण्यात सक्षम असेल. यात 12GB पर्यंत रॅम मिळेल. तसेच, वापरकर्ते मॅग्नेटीक कीबोर्डसह सहजपणे टाइप करण्यास सक्षम असतील. कंपनीच्या पहिल्या टॅबलेटला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 1 महिना स्टँडबाय फीचर मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo