तुमचे डिजिटल Voter Id कार्ड ‘अशा’ प्रकारे मोबाईलमध्ये डाउनलोड करा
डिजिटल Voter Id कार्ड घरबसल्या डाउनलोड करा
DigiLocker च्या मदतीने तुम्ही हे काम करू शकता.
बघा डिजिटल Voter Id कार्ड डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
DigiLocker हे एक ऍप आहे, जे व्हर्चुअल Aadhaar, Degree Certificate, insurance certificates, vehicle documents ठेवते. यामध्ये, तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या विविध सेवांमध्ये प्रवेश करू शकता. पोर्टलचा वापर नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी, मतदार ओळखपत्र अपडेट करण्यासाठी आणि डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. ज्याला e-EPIC असेही म्हणतात.
तुम्ही आता तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड आणि स्टोअर करू शकता. इंटरनेट कनेक्टेड मोबाइल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर डिजिटल मतदार ओळखपत्र मोफत कसे डाउनलोड करायचे ते बघा…
ऑफिशियल वेबसाइट
सर्वप्रथम https://eci.gov.in/e-epic/ या लिंकवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फोन नंबरची नोंदणी करा. पोर्टल उघडल्यानंतर, डाउनलोड ई-एपिक वर क्लिक करा आणि तुमचा एपिक क्रमांक प्रविष्ट करा, जो तुमच्या मतदार आयडीवर 10 अंकी युनिक आयडी आहे. आता तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र तुमच्या स्मार्टफोनवर PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र 'अशा' प्रकारे डाउनलोड करा.
– तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक करण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या पोर्टलच्या (https://www.nvsp.in/) होम पेजला भेट द्या.
– होमपेजवरील फॉर्मवर क्लिक करा. यानंतर फॉर्म 8 वर क्लिक करा.
– जर तुम्ही कुटुंबातील सदस्याचा मतदार आयडी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सेल्फ किंवा फॅमिली पर्याय निवडा.
– यानंतर, फॉर्ममधील मतदार यादीतील 'करेक्शन ऑफ एंट्रीज' वर क्लिक करा. यामध्ये, तुम्हाला तुमच्या मतदार आयडीमध्ये नोंदणी करायचा असलेला फोन नंबर टाका.
– लक्षात घ्या की, या प्रक्रियेस काही दिवस लागू शकतात.
– एकदा फोन नंबर मतदार ओळखपत्राशी जोडल्यानंतर, https://eci.gov.in/e-epic/ या वेबसाइटला भेट द्या.
– EPIC नंबर प्रविष्ट करा आणि डिटेल्स व्हेरिफाय करा.
– व्हेरिफाय केल्यानंतर, तुमचा फोन नंबर प्रविष्ट करा आणि OTP वापरून तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर डिजिटल मतदार आयडी डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड एपिक वर क्लिक करा.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile