WhatsApp PNR Checker : WhatsApp द्वारे PNR आणि लाईव्ह ट्रेन स्टेटस कसे तपासायचे…

Updated on 16-Nov-2022
HIGHLIGHTS

तुम्ही WhatsApp द्वारे तुमचा PNR आणि लाईव्ह ट्रेन स्टेटस तपासू शकता.

यासाठी Railofy ची WhatsApp सेवा उपलब्ध आहे.

Railofy आणि IRCTC ने WhatsApp PNR Checker साठी भागीदारी केली आहे.

तुम्ही WhatsApp वापरकर्ते असल्यास, तुम्हाला कोणत्याही PNR आणि लाइव्ह ट्रेन स्टेटस चेकर ऍप किंवा वेबसाइटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. IRCTC आणि Railofy मधील भागीदारी तुम्हाला WhatsApp वरच हे काम करण्यास सक्षम करते. या भागीदारीमुळे, तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून WhatsApp द्वारे PNR आणि लाईव्ह ट्रेनची स्टेटस सहज तपासू शकता. बघुयात यासाठी तुम्हाला काय करावे लागेल… 

हे सुद्धा वाचा : Airtel VS Jio: 70 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वस्तात मस्त प्लॅन! कोणता प्लॅन आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम…

WhatsApp PNR आणि लाइव्ह ट्रेन स्टेटस चेकर कसे काम करतात?

> सर्वप्रथम, तुम्हाला Railofy चा WhatsApp नंबर म्हणजेच +91-9881193322 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. याशिवाय, व्हॉट्सऍप लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट केलेले असावे.

> आता तुम्हाला तुमच्या चॅट स्क्रीनवर Railofy शोधायचे आहे. मात्र, याआधी तुम्हाला तुमची व्हॉट्सऍप कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करणे आवश्यक आहे.

> आता तुम्हाला तुमच्या तिकिटावर असलेला 10 अंकी PNR नंबर Railofy चॅटमध्ये टाकावा लागेल. 

> आता काही सेकंदात Railofy चा चॅटबॉट तुम्हाला तुमचा PNR स्टेटस देईल: यामध्ये ट्रेन नंबर, अंदाजे डिपार्चर इ. एकूणच, असे म्हणता येईल की तुम्ही तुमच्या PNR स्टेटसबद्दल संपूर्ण माहिती येथे मिळवू शकता.  

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :