JioCinema वर उपलब्ध आहेत ‘हे’ जबरदस्त चित्रपट, खिशाला ताण न देता बघा अगदी मोफत

JioCinema वर उपलब्ध आहेत ‘हे’ जबरदस्त चित्रपट, खिशाला ताण न देता बघा अगदी मोफत
HIGHLIGHTS

JioCinema वर हॉलीवूड आणि बॉलीवूडचे अनेक चित्रपट उपलब्ध

हॉरर, रोमँटिक, क्लासिक, कॉमेडी इ. कंटेंट बघायला मिळणार

दृश्यम, रुही इ. चित्रपट जिओसिनेमावर मोफत बघा

रिलायन्स Jio कंपनीचा OTT प्लॅटफॉर्म JioCinema अलीकडे बराच चर्चेत आहे. या ऍपवर बॉलीवूड आणि हॉलिवूडचे अनेक उत्तम चित्रपट आहेत. नुकतेच या ऍपचा अन्युअल सब्स्क्रिप्शन प्लॅन 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला. तुम्हाला हॉरर, रोमँटिक, क्लासिक, कॉमेडी इ. कंटेंट बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि खिशाला ताण न देता ऍप वर काही जबरदस्त चित्रपट फ्री मध्ये उपलब्ध आहेत. आम्‍ही तुम्‍हाला JioCinema वर उपलब्‍ध असलेल्‍या सर्वोत्कृष्‍ट चित्रपटांची यादी बघुयात –  

रुही 

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी आणि वरुण शर्मा देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हार्दिक मेहता दिग्दर्शित हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. 

प्यार का पंचनामा 2

प्यार का पंचनामा 2' JioCinema वर पाहू शकतात. हा चित्रपट अंशुल, सिद्धार्थ आणि तरुण या तीन मित्रांभोवती फिरतो, जे आपलं नातं समजून घेण्यासाठी धडपडत असताना दिसतात. 

स्त्री 

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चांगलाच गाजला होता. 2018 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. 

दृश्यम 

 मल्याळम थ्रिलर 'दृश्यम'चा हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर तब्बू आणि इशिता दत्ताही या चित्रपटात आहेत. चित्रपटात तब्बू पोलीस इन्स्पेकटरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील चांगलाच गाजला आहे. 

गो गोआ गॉन 

झोम्बीजवर आधारित गो गोआ गॉन हा चित्रपट तीन मित्रांवर आधारित आहे. हा चित्रपट गोव्याला सुट्टीवर गेलेल्या हार्दिक, बनी आणि लव या पात्रांवर आहे. बेटावर रेव्ह पार्टी केल्यानंतर, ते झोम्बीच्या मध्ये अडकलेले दिसतात. या चित्रपटात सैफ अली खान, कुणाल खेमू आणि वीर दास हे मुख्य भूमिकेत आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo