घाण,धुळीची चिंता नाही! सणासुदीच्या हंगामात Smart Air Purifiers मोठ्या सवतींसह उपलब्ध, पहा यादी

Updated on 14-Oct-2024
HIGHLIGHTS

हवेची AQI पातळी शहरांमध्ये दिवसेंदिवस हानिकारक होत आहे.

अनेक Air Purifiers तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ हवा देण्यास मदत करतात. '

Amazon सेलदरम्यान Philips, Xiaomi इ. प्रसिद्ध ब्रॅंड्सची उपकरणे समाविष्ट

Air Purifiers आजकाल खूप महत्वाचे उपकरण झाले आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. तुम्ही शहरात जिकडे तिकडे हवा दूषित होण्याच्या बातम्या रोजच ऐकत असाल. Air Purifiers प्रदूषण, धूळ आणि ऍलर्जीन काढून टाकून ताजी हवा प्रदान करण्यास मदत करेल. हवेची AQI पातळी शहरांमध्ये दिवसेंदिवस हानिकारक होत चालली आहे.

AQI म्हणजे काय?

EPA आणि तुमची राज्य पर्यावरण संस्था हवेतील प्रदूषण मोजतात. मग ते लोकांना हवेबद्दल सांगण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स किंवा AQI चा वापर करतात. एखाद्या वातावरणातील हवा किती चांगली किंवा वाईट आहे, हे लोकांना सांगण्याचा निर्देशांक हा एक द्रुत मार्ग असू शकतो.

दरम्यान, अनेक Air Purifiers तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ हवा देण्यास मदत करतात. यामध्ये HEPA फिल्टर्स असतात, जे अगदी लहान कण देखील कॅप्चर करू शकतात. त्याबरोबरच, काही मॉडेल्समध्ये यूव्ही लाईट किंवा ओझोन जनरेटरसारख्या सुविधाही दिल्या जातात. Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलदरम्यान आणि Flipkart वर देखील अनेक Air Purifiers सवलतीसह उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि उत्तम Air Purifiers ची यादी तयार केली आहे.

Philips AC0950 Smart Air Purifier for Home

प्रसिद्ध कंपनी फिलिप्सने Smart Air Purifier सादर केले आहे. हे रिअल टाइम AQI माहिती प्रदान करतो. Amazon वर हे उपकरण 9,799 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्ड्सवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. हे 300 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या खोलीतील हवा कमीत कमी वेळेत स्वच्छ करू शकते. हे विषाणू, ऍलर्जीन, धूळ आणि पीएम 2.5 पातळीचे प्रदूषण शोषून घेते. मोबाइल ॲपद्वारे ते नियंत्रित केले जाऊ शकते. येथून खरेदी करा

Xiaomi 4 Lite Smart Air Purifier for Home

हे Xiaomi चे स्मार्ट एअर प्युरिफायर आहे, ज्यामध्ये उच्च दर्जाचे HEPA फिल्टर आणि कार्बन फिल्टर आहे. Amazon वर हे प्युरिफायर 9,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्ड्सवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. हे उपकरण जीवाणू, विषाणू, धूळ आणि गंध फिल्टर करते आणि शुद्ध हवा देते. 462 चौरस फूट क्षेत्रफळाच्या खोल्यांसाठी हे सर्वोत्तम आहे. मोबाईल ॲपद्वारेही ते नियंत्रित करता येते. तुम्ही ते अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटच्या मदतीनेही चालवू शकता. यामध्ये हवेची गुणवत्ता दर्शविणारा AQI डिस्प्ले देखील आहे. येथून खरेदी करा

Eureka Forbes Air Purifier 150

युरेका फोर्ब्सचे हे एअर प्युरिफायर 200 चौरस क्षेत्रफळ असलेल्या खोलीतील हवा स्वच्छ करू शकते. हे या यादीतील सर्वात स्वस्त उपकरण आहे. होय, Amazon GIF सेलदरम्यान हे प्युरिफायर केवळ 5,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही हे प्युरिफायर Rs 291 च्या EMI वर देखील खरेदी करू शकता. तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळेल. यात 360 डिग्री एअर टेक्नॉलॉजी आहे, जी सर्व बाजूंनी घाणेरडी हवा शोषून घेते आणि स्वच्छ हवा सोडते. हे सर्वात स्वस्त एअर प्युरिफायर आहे, जे H13 स्तर HEPA फिल्टरसह येते. हे उपकरण Flipkart वर देखील खरेदीसाठी अनेक ऑफर्ससह उपलब्ध आहे. खरेदीसाठी क्लिक करा.

Honeywell Air Purifier for Home

हनीवेलचे होम एअर प्युरिफायर 3 स्टेज एअर फिल्टरेशन तंत्रज्ञानासह येते. हे उपकरण 7,999 रुपयांना Amazon वर उपलब्ध आहे. हे H13 च्या उच्च स्तरीय HEPA फिल्टरसह सुसज्ज आहे, जे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण फिल्टर करते. कंपनीचा दावा आहे की हे प्युरिफायर 99.99% प्रदूषक आणि सूक्ष्म ऍलर्जीन साफ ​​करते. 3000 हून अधिक वापरकर्त्यांनी त्याला 4.0 ची उच्च रेटिंग दिली आहे. Honeywell Air Purifier फ्लिपकार्टवर देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :