प्रेक्षकांनो ! ‘या’ चित्रपटांमध्ये मिळेल जबरदस्त कोर्ट रूम ड्रामा कंटेंट, OTT वर उपलब्ध
जबरदस्त कोर्ट रूम ड्रामा कंटेंट असणाऱ्या चित्रपटांची यादी
हे सर्व चित्रपट OTT वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
जय भीम, शौर्य इ. चित्रपटांचा यादीत समावेश
मनोज बाजपेयी यांची नवी OTT रिलीज 'सिर्फ एक बंदा काफी है' प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळवत आहे. या कोर्टरूम ड्रामा चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित आहे, असे सांगितले जात आहे. तुम्ही देखील कोर्ट रूम ड्रामा कंटेंटचे दिवाने आहेत, तर आम्ही तुमच्यासाठी खास चित्रपटांची यादी तयार केली आहे. ज्यामध्ये जबरदस्त कोर्टरूम ड्रामा दाखवण्यात आला आहे. हे सर्व चित्रपट OTT वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
जय भीम (2021)
हा चित्रपट नोव्हेंबर 2021 मध्ये Amazon Prime Video वर रिलीज झाला होता. साऊथचा सुपरस्टार सुरिया स्टारर हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बराच चर्चेत आणि वादात देखील होता. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
सेक्शन 375
चित्रपटात भारतीय दंड संहितेच्या सेक्शन 375 संदर्भात कोर्ट रूम ड्रामा दिसत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना क्रिमिनल वकील तरुण सलुजाच्या भूमिकेत आहे. तर ऋचा चड्ढा सरकारी वकील हिरल मेहताच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांनी हा अप्रतिम चित्रपट बघायलाच हवा. चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.
शौर्य
'शौर्य' चित्रपटात आर्मी कोर्ट ड्रामा दाखवला आहे. हा अमेरिकन चित्रपट 'अ फ्यू गुड मेन' वर आधारित आहे. 2008 च्या या चित्रपटात दीपक डोबरियाल, केके मेनन, मिनिषा लांबा आणि राहुल बोस यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.
ओ माय गॉड
ओ माय गॉड चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार यांनी महत्त्वाची भूमिका सरकारी आहे. त्याबरोबरच, या चित्रपटाची कथा कांजी मेहता म्हणजेच अभिनेता परेश रावल यांची आहे. यामध्ये अगदी मनोरंजक आणि भावनिक पद्धतीने कोर्ट रूम ड्रामा दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट Netflix वर उपलब्ध आहे.
शाहिद
राजकुमार रावचा हा चित्रपटही रियल लाईफ इन्स्पायर्ड स्टोरीवर आधारित आहे. चित्रपटात राजकुमारने वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते शाहिद आझमी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट शाहिद आझमी व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, ज्याची 2010 मध्ये मुंबईत हत्या झाली होती. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile