सध्या का बरं चर्चेत आहे Bumble Dating App ? कसे कार्य करतो, जाणून घ्या सर्व काही…
सध्या बातम्यांमध्ये Bumble Dating Appची चर्चा
काय आहे हे डेटिंग ऍप आणि कसे कार्य करतो.
ऑनलाइन डेटिंग ऍप्स वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
सध्या बातम्यांमध्ये Bumble Dating App ची बरीच चर्चा सुरु असते. राजधानी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर या बहुचर्चित डेटिंग ऍपचे नाव समोर येत आहे. कारण या डेटिंग ऍपच्या माध्यमातून आरोपी आफताब आणि श्रद्धा यांची भेट झाली होती. या लेखात आज आम्ही तुम्हाला या डेटिंग ऍपबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. आता दिल्ली पोलीस बंबल ऍपवरून आरोपीची सर्व माहिती गोळा करू शकतात. याशिवाय हा आरोपी किती महिलांच्या संपर्कात होता, हेही पाहिले जात आहे. जाणून घेऊयात सविस्तर…
काय आहे Bumble Dating App?
हे डेटिंग ऍप 2014 मध्ये Whitney Wolfe Herd ने सुरू केले होते. या ऍपचे फिचर म्हणजे या ऍपमध्ये योग्य मॅच मिळाल्यानंतरच केवळ महिला पहिला संदेश पाठवू शकतात. म्हणजेच या ऍपमध्ये योग्य मॅच सापडल्यानंतरही पुरुष मेसेज करू शकत नाहीत. एकूणच या ऍपद्वारे केवळ महिलाच पहिला मॅसेज करू शकतात. या डेटिंग ऍपचे जगभरात सुमारे 40 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत.
BUMBLE APP कसे वापरतात?
हे ऍप तुमच्या फोनवर इंस्टॉल केल्यानंतर, तुम्ही ते सहज सेटअप करू शकता. यानंतर, हे ऍप स्वाइप मॉडेलवर आपले काम पूर्ण करते. म्हणजेच कोणत्याही वापरकर्त्याचे प्रोफाइल लाईक केल्यानंतर, तुम्ही ते स्वाइप करू शकता. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा एक मॅच केली जाते. मात्र, मॅच मिळाल्यानंतरही फरक एवढाच आहे की, यातून फक्त महिलाच पहिला मॅसेज देऊ शकतात. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ही या ऍपची चांगली बाब आहे. मात्र, लक्षात घ्या की, जर मॅच झाल्यानंतर 24 तासांच्या आत कोणत्याही महिलेने मेसेज केला नाही तर ही मॅच आपोआप रिमूव्ह होईल.
ऑनलाइन डेटिंग ऍप्स वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या!
> सर्वात आधी तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. स्वतःबद्दल सर्व काही सांगण्यापूर्वी, समोरची व्यक्ती देखील तुम्हाला स्वतःबद्दल सर्वकाही अचूकपणे सांगत आहे की नाही हे सुनिश्चित केले पाहिजे.
> भावनिक होणे टाळा, ऑनलाइन दिशाभूल होऊ देऊ नका.
> आजकाल हे बघायला मिळतंय आणि अनेक चित्रपटातही याची जाणीव करून दिली आहे. खरं तर आजकाल लोक समोरच्या व्यक्तीचा DP पाहून प्रभावित होतात, तुम्हाला हे करण्याची गरज नाही, तुम्ही ही प्रोफाइल तपासणे आवश्यक आहे.
> तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीबद्दल तुम्हाला सर्व काही माहित असले पाहिजे. काहीवेळा ऑनलाइन लोक स्वतःला काहीतरी वेगळे दाखवतात परंतु ते काहीतरी वेगळेच असतात. ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवावी.
> डेटिंग ऍपची सवय तुमचे खूप नुकसान करू शकते. बरेचदा, तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, म्हणूनच तुम्ही कोणत्याही डेटिंग ऍपची सवय टाळली पाहिजे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile