‘नेटफ्लिक्स’विषयी तुम्हाला हे माहित आहे का?

‘नेटफ्लिक्स’विषयी तुम्हाला हे माहित आहे का?
HIGHLIGHTS

भारतीय लोकांना नेटफ्लिक्सची ही सेवा पसंत येणार आहे का? की भारतीय कंटेंट कमतरतेमुळे कंपनीला ह्याचे नुकसान सहन करावे लागेल.

काही दिवसांपूर्वीच ही सेवा भारतात लाँच झाली आहे. असे सांगितले जातय की, आपण ह्या सेवेच्या माध्यमातून व्हिडियो स्ट्रिमिंग करु शकतो आणि ह्याच्या येण्याने हा लवकरच सिनेमागृहांची जागा घेणार आहे. पण कसे? हे नेमकं काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का? तर सर्वात आधी हे माहित करुन घेणे जरुरीचे आहे हे कसे काम करेल. ह्याच्या लाँचिंगवेळी असे सांगितले गेले होते की, ह्याच्या वापरासाठी आपल्याला एका महिन्यासाठी ५०० रुपये खर्च करावे लागतील. असे नाही की, भारतात ह्याबाबत कोणाला काही माहित नाही. आपल्यापैकी असे असंख्य लोक आहेत, ज्यांना ह्या सेवेबाबत माहित आहे आणि जे ह्याची स्तुतीसुद्धा करत आहे. मात्र असेही काही लोक आहेत, जे ह्याला विदेशी सेवा मानत आहेत आणि त्यांचा असा समज झाला आहे की, ही सेवा केवळ तेच लोक वापरु शकतात, ज्यांना ह्याविषयी माहित आहे.मात्र प्रत्यक्षात असे नाही आहे. जर तुम्ही ह्यातील छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर हे वापरासाठी खूप सोपे आहे, असे म्हणता येईल. चला तर मग ह्यासंबंधी काही माहिती करुन घेऊयात…

 

काय आहे ही सेवा?(नेटफ्लिक्स, ऑन डिमांड व्हिडियो स्ट्रीमिंग सेवा)

ही अमेरिकेत १८ वर्षांपूर्वी लाँच झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत तेथील लोकांसाठी ही खूप आवडती सेवा झाली आहे. ह्याला अलीकडेच काही दिवसांपूर्वी लाँच केले गेले. ह्याच्या माध्यमातून आपण ऑन-डिमांड व्हिडियो स्ट्रीम करु शकता. आपल्याला कोणताही व्हिडियो, चित्रपट पाहण्यासाठी मोठी रांग लावाली लागणार नाही. आता घरबसल्याही आपण ह्याच्या माध्यमातून आपल्या पसंतीचा कुठचाही व्हिडियो स्ट्रीम करु शकता.

ह्या सेवेच्या नोंदणीकरिता आपल्याला ५०० रुपये प्रति महिन्याच्या हिशोबोने हे पैसे द्यावे लागतील, त्याचबरोबर जर आपल्याला HD कंटेट पाहायची आवड असेल तर, आपल्याला एका महिन्याच्या ह्या प्लानमध्ये १५० रुपये अतिरिक्त रक्कम भरावी लागेल आणि ही सेवा मग ६५० रुपये महिना अशी होईल.

ह्या सेवेच्या अंतर्गत टीव्हीवर येणारे प्रसिद्ध शो आणि सिनेमांची खूप मोठी साखळी आहे. आता तुम्ही असे म्हणाल की, हे तर आपल्याला यूट्युब आणि टोरेंट्सवर पण मिळतात. मात्र युट्यूब केवळ टीव्ही शोचं मिळतात आणि टोरेेंट्स ही अनधिकृत साइट आहे. मात्र ही सेवा आपल्याला अधिकृतरित्या मिळत आहे. टोरेंट्सच्या वापराने आपल्या सिस्मटमध्ये अनेक भयंकर असे वायरस येऊ शकतात. मात्र नेटफ्लिक्समुळे आपल्याला असा कोणताही धोका नाही. ही खूप सुरक्षित सेवा आहे.

नेटफ्लिक्स, ऑन डिमांड व्हिडियो स्ट्रिमिंग सेवा कशी सब्सक्राइब करायची?

सर्वात आधी आपल्याला नेटफ्लिक्सवर जाऊन आपला आयडी बनवावा लागेल, त्यासाठी नेटफ्लिक्सची वेबसाइट, अॅनड्रॉईड अॅप, आयओएस अॅप किंवा विंडोज अॅपचा वापर करुन बनवू शकता.  येथे जाऊन आपण आपला आयडी बनवत असाल तर, हा आपल्याला आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती मागेल आणि जसे की लाँच वेळी सांगितले गेले होते की, पहिला महिना ही सेवा आपल्याला एकदम मोफत मिळेल, आणि त्यानंतर आपले पैसे कापणे सुरु होईल.

 

आयडी बनविल्यानंतर आपण ह्याचा वापर केव्हाही आणि कुठेही करु शकता. मात्र अशा वेळी असा प्रश्न आपल्या मनात येतो की, ह्यात किती प्रमाणात व्हिडियो असतील. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विदेशी कंटेंट ह्या सेवेत अगदी मोठ्या प्रमाणात मिळतील, पण भारतीय कंटेट हळूहळू ह्यात समाविष्ट केला जात आहे. तथापि, जे पैसे आपण देत आहात त्यात आपल्याला कंपनीनुसार भारतात ५०० चित्रपट आणि २०० टिव्ही शो मिळतील. तर दुसरीकडे असेही सांगितले जातय की, ह्याला भारतात केवळ ८० भारतीय चित्रपटांसह लाँच केले गेले आहे, जी भारतीयांसाठी निराशाजनक बाब आहे.

परंतू असेही नाही की, भारतातील सर्वच लोकांना हिंदी आणि भारतीय कंटेंट हवा आहे. आपल्या देशात असेही असंख्य लोक आहेत, ज्यांना विदेशी कंटेंट हवा आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, ह्या माध्यमातून त्यांना मनोरंजनाचे आणखी एक माध्यम मिळेल, जे त्यांना अगदी सहजपणे उपलब्ध आहे. आणि  ते त्यांना त्यांच्या मोबाईलवरही उपलब्ध होईल.

Ashvani Kumar

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo