Smartphone buying guide 2018 – स्मार्टफोन विकत घेताना घ्यावयाची काळजी
आजकाल स्मार्टफोन मार्केट मध्ये गर्दी खूप वाढली आहे, अनेक कंपन्या वेगवेगळ्या किंमतीत वेगवेगळे व्हॅल्यू फॉर मनी फोन्स देत आहेत. खाली आम्ही तुम्हाला या गर्दीतून तुमच्यायोग्य स्मार्टफोन निवडण्यासाठी मदत व्हावी म्हणून एक सविस्तर लेख लिहिला आहे.
स्मार्टफोन्स आजकाल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत, जे आपल्याला फक्त आपल्या नातेवाईकांशी जोडण्यास मदत करत नाही तर काही लोकांसाठी स्मार्टफोन बिजिनेस टूल म्हणून पण उपयोगी ठरतो. काही लोक त्यांचा वापर करमणुकीसाठी करतात तर अनेकजण त्यात आठवणी कॅप्चर करत असतात. जशी जशी स्मार्टफोन्सची मागणी वाढली तसा तसा पुरवठा पण वाढला आहे. एक काळ होतो, जेव्हा मोबाईल घेणे म्हणजे दुकानात जाऊन ब्रॅण्डचा जो चांगला मोबाईल असेल तो घेतला जायचा. पण आजकाल कंपन्या वेगवेगळे पर्याय देत आहेत, प्रत्येक मॉडेल मध्ये वेगळा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा सेट आहे. बजेट, फोनचा वापर असे अनेक घटक आजकाल फोन घेताना लक्षात घ्यावे पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला काय हवे. यामुळे फोन घेणे डोकेदुखी ठरू शकते पण काळजी नसावी आम्ही तुमची हि डोकेदुखी कमी करू शकतो. आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक वने स्टॉप गाईड जो तुम्हाला तुमचा स्मार्टफोन विकत घेण्यास मदत करेल.
प्रोसेसर
फायदा: जेवढा पावरफुल प्रोसेसर असेल तेवढा फोन कमी हँग होईल.
अर्थ: प्रोसेसर स्मार्टफोनच्या मेंदूसारखा आहे. जेवढा पावरफुल प्रोसेसर असेल तेवढ्या सहज फोटो एडिटिंग होईल, तेवढ्याच जलद ऍप्स उघडले जातील आणि अर्थात गेमिंग पण लॅग फ्री होईल. सध्या Qualcomm Snapdragon 845 हा मोबाईल फोनसाठी उपलब्द असलेला सर्वात पावरफुल प्रोसेसर आहे, जो OnePlus 6 आणि Asus Zenfone 5z सारख्या फोन्समध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी Snapdragon 835 टॉप मोबाईल CPU होता त्यामुळे हा प्रोसेसर असलेले फोन्स पण तेवढेच चांगले असू शकतील.
प्रोसेसर ब्रँड
फायदा: कमी किंमतीती पण अनेक पर्याय उपलब्द होतात
अर्थ: जवळपास सर्वच अँड्रॉइड स्मार्टफोन्स मध्ये Qualcomm किंवा MediaTek चे प्रोसेसर असतात. Qualcomm चे प्रोसेसर हायएंड स्मार्टफोन्स मध्ये वापरले जातात तर MediaTek प्रोसेसर एन्ट्री लेवल आणि मिड रेंज स्मार्टफोन्स मध्ये वापरले जातात. हे प्रोसेसर बॅटरी लाईफ आणि पावर मधील तोल सांभाळतात. जर तुम्ही Samsung किंवा Honor चे डिव्हाईस विकत घेत असाल तर त्यात तुम्हाला त्यांचा Exynos किंवा Kirin CPU मिळेल. ऍप्पल आपल्या आयफोन्स साठी स्वतःचे प्रोसेसर स्वतः बनवते, त्याचा लेटेस्टप्रोसेसर A11 Bionic चिप आहे. Snapdragon आणि MediaTek प्रोसेसर मधील Snapdragon चिप्स चांगल्या चालतात पण त्या तेवढ्याच महाग असतात.
प्रो टीप: प्रोसेसरच्या नावात जेवढा मोठं आकडा असेल तेवढा तो चांगला चालतो. उदाहरणार्थ Snapdragon 845 Snapdragon 660 पेक्षा चांगला चालतो, तर Snapdragon 450 पेक्षा Snapdragon 660 चांगला आहे.
प्रोसेसर स्पेसिफिकेशन्स
प्रत्येक प्रोसेसरच्या स्पेसिफिकेशन मध्ये त्या चिप्स मधील कोर्सची संख्या आणि त्याचा क्लॉकस्पीड सांगितला जातो. उदाहरणार्थ, “1.4गिगाहर्टझ ऑक्टा-कोर प्रोसेसर” किंवा “2.0गिगाहर्टझ क्वाड-कोर प्रोसेसर.” जेवढे जास्त कोर्स असतात तेवढीच जास्त चांगली परफॉर्मन्स असेलच असे नाही पण जेवढा जास्त क्लॉकस्पीड तेवढी चांगली परफॉर्मन्स असते. खाली आम्ही कोर्स बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.
कोर्स
फायदा: जास्त कोर्स = चांगली परफॉर्मन्स.
अर्थ: कोर्स म्हणजे प्रोसेसरच्या मसल्स सारखे असतात. जेवढे जास्त कोर्स असतील तेवढा चांगला प्रोसेसर असेल. म्हणजे ड्युअल-कोर पेक्षा क्वाड-कोर पावरफुल असतो आणि त्यापेक्षा जास्त पावरफुल ऑक्टा-कोर प्रोसेसर असतो. प्रोसेसर मध्ये ठरलेले कोर्स असतात जे तुम्ही नंतर बदलू शकत नाहीत. पण तुम्ही घेताना जास्त किंवा कमी कोर्स असलेला फोन विकत घेऊ शकता.
मिथक: फोन घेताना जास्त कोर्स असलेला फोन घ्यावा .
सत्य: जर तुम्ही तुमच्या फोनवर सतत हेवी गेम्स खेळणार नसाल तर तुम्हाला हायएंड प्रोसेसरची गरज नाही.
क्लॉकस्पीड
फायदा: जेवढा जास्त क्लॉकस्पीड असेल तेवढी जास्त चांगली परफॉर्मन्स तुम्हाला मिळते.
अर्थ: तुमच्या प्रोसेसरचा काम करण्याचा वेग म्हणजे क्लॉकस्पीड. क्लॉकस्पीड गिगाहर्टझ मध्ये मोजला जातो आणि जेवढा जास्त आकडा असेल तेवढा वेगवान तुमचा प्रोसेसर असेल. आजकाल सर्वात चांगल्या प्रोसेसरचा क्लॉकस्पीड 2.9गिगाहर्टझ इतका जास्त असू शकतो.
ग्राफ़िक्स प्रोसेसिंग यूनिट
ग्राफिक प्रोसेसिंग युनिट किंवा GPU वर फोनची गेमिंग परफॉर्मन्स अवलंबून असते. GPU हा प्रोसेसरचा भाग असल्यामुळे तुम्हाला त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही तुमच्या फोन साठी GPU निवडू शकत नाही. मोबाईल प्रोसेसर GPU सह येऊ जो त्याची परफॉरमन्स सुधारतो त्यामुळे तुम्हाला त्याचा करण्याचाही जास्त गरज नाही.
डिस्प्ले
फायदा: एका हाताने पण वापरता यावा आणि चांगले व्हिज्युअल्स मिळावेत.
अर्थ: डिस्प्ले मुले तुम्ही तुमच्या फोनवरील कन्टेन्ट बघू शकता आणि त्याशी इंटरॅक्ट करू शकता. तुम्ही जे काही स्मार्टफोन वर करता त्यात तुम्हाला आनंद मिळेल कि नाही हे पूर्णपणे डिस्प्लेची साईझ आणि त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. जर तुम्हाला योग्य डिस्प्ले निवडायचा असेल तर खाली दिलेलं मुद्दे लक्षात ठेवा.
डिस्प्ले साईझ
फायदा: फोन एक हाताने वापरता येतो कि दोन हे यावरून ठरते.
अर्थ: डिस्प्ले साईझ वर तुमचा फोन किती मोठा असेल ते ठरते. डिस्प्लेच्या कर्णावरून तयचय साईझ इंचात मोजली जाते. जेवढा मोठा डिस्प्ले तेवढा मोठा फोन आणि तेवढाच चांगला विविंग एक्सपेरियन्स. स्मार्टफोन्स वेगवेगळ्या आकारात येतात आणि त्या प्रत्येकाचा वापर वेगवेगळा असतो. तुच्यासाठी योग्य आकार जाणून घेण्यासाठी माही खाली त्याची सविस्तर माहिती दिली आहे ती वाचा.
1. 5-इंच किंवा त्यापेक्षा कमी
आयफोन SE प्रमाणे ज्या स्मार्टफोन्सचा डिस्प्ले 5-इंचा पेक्षा कमी असतो ते स्मार्टफोन्स त्या लोकांसाठी योग्य ठरतात ज्या लोकांचे हात छोटे असतात आणि ज्यांना एका हाताने फोन वापरायचा असतो. छोटी स्क्रीन बॅटरी पण कमी खाते जी एक चांगली बाब आहे कारण 5-इंच (किंवा त्यापेक्षा छोटया) स्मार्टफोन मध्ये बॅटरी पण मोठ्या फोनच्या तुलनेत छोटी असते.
2. 5.5-6 इंच
जे स्मार्टफोन्स 5.5-6 इंचाचे असतात ते अशा लोकांसाठी योग्य जे मोठयाप्रमाणात सोशल मीडिया वापरतात, फोटोज घेतात किंवा त्यांचे काम स्मार्टफोन वरून करतात. या डिस्प्ले साईझ वर विडिओ बघण्याचा अनुभव चांगला येतो. आजकाल हि साईझ सर्रास वापरली जाते आणि हि जास्त बॅटरी पण वापरात नाही.
3. 6.5-इंच आणि त्यापेक्षा जास्त
ज्या फोन्सचा डिस्प्ले 6.5 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असतो त्यांच्यासाठी चांगले असतात जे सतत आपल्या फोन्सवर गेम्स खेळात असतात किंवा कन्टेन्ट बघत असतात. एवढा मोठा किंवा यापेक्षा मोठा डिस्प्ले असलेले फोन बऱ्याचदा वजनदार असतात आणि त्यामुळे यात मोठी बॅटरी पण असते. हे फोन वापरताना त्यांच्या मोठ्या आकारामुळे दोन्ही हातांचा वापर करावा लागतो.
आस्पेक्ट रेशिओ
फायदा: यामुळे छोट्या बॉडी मध्ये पण मोठा डिस्प्ले बसतो.
अर्थ: आस्पेक्ट रेशिओ वरून दिलेल्या साईझच्या डिस्प्लेची लांबी आणि रुंदी ठरते. गेल्यावर्षी पर्यंत सर्व फोन 16:9 आस्पेक्ट रेशिओ नुसार येत होते पण आता 18:9 आणि 19:9आस्पेक्ट रेशिओ असलेले फोन्स येत आहेत. ज्यात फोनची रुंदी कमी असते आणि लांबी जास्त असते ज्यमुळे फोन हातात पकडणे सोप्पे होते.
व्हिजुअल टीप: दोन फोन्स ज्यांची डिस्प्ले साईझ 5.5 इंच असेल पण एकाचा आस्पेक्ट रेशिओ 16:9 असेल तर दुसऱ्याचा 18:9, हातात घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल सारखीच डिस्प्ले साईझ असूनही एक फोन हातात पकडणे कठीण वाटते तर दुसरा फोन सहज वापरता येतो.
पॅनलचा प्रकार
फायदा: व्हायब्रन्ट रंग, बॅटरी लाईफ आणि चांगला विविंग एक्सपेरियन्स हे सर्व डिस्प्ले पॅनलच्या प्रकारावर अवलंबून असते.
अर्थ: आजकल्याच्या स्मार्टफोन्स मध्ये डिस्प्ले साठी IPS-LCD किंवा OLED पॅनेल्स वापरले जातात. जे लोक त्यांच्या फोटोवर जास्त फोटो एडिटिंग करत नाहीत त्यांच्यासाठी अचूक रंग दाखवणारा IPS-LCD पॅनल पुरेसा आहे. पण जर तुम्हाला व्हायब्रन्ट रंग, HDR विडिओ आणि चांगली बॅटरी लाईफ हवी असेल तर तुम्ही OLED पॅनल असलेला स्मार्टफोन घ्यावा. त्याचबरोबर डिस्प्लेच्या ब्रायटनेस रेटिंग कडे पण लक्ष असू द्या दुपारच्या उन्हात पण डिस्प्ले वरील अक्षरे वाचता यावी यासाठी कमीत कमी 150 nits (किंवा 500 lumens) असलेला डिस्प्ले घ्यावा. IPS पॅनेल्स आणि OLED डिस्प्ले दोन्ही चांगले विविंग अँगल्स देतात त्यामुळे त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही.
प्रो टीप: AMOLED, सुपर AMOLED किंवा ऑप्टिक AMOLED इत्यादी फक्त OLED टेक्नॉलजीचे व्हेरिएंट आहेत ज्यात छोटे छोटे बदल आहेत पण सर्वांचे फायदे जवळपास सारखेच आहेत.
रिजोल्यूशन
फायदा: जास्त रिजोल्यूशन = शार्पर इमेज.
अर्थ: डिस्प्ले वरील पिक्सल्सची संख्या म्हणजे रिजोल्यूशन, जे लांबी x रुंदी या स्वरूपात मोजले जाते. जेवढे जास्त पिक्सल्स तेवढी जास्त क्लॅरिटी आणि शार्पनेस. कधी कधी याचा उल्लेख HD-Ready (720p), HD (1080p) किंवा QHD (1440p)असा पण केला जातो. जेवढे जास्त रिजोल्यूशन तेवढाच महाग फोन होतो. जर रिजोल्यूशनच्या पुढे + चे चिन्ह असेल तर त्याचा अर्थ असा कि फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशिओ आहे. बऱ्याच कामांसाठी एक Full HD डिस्प्ले पुरेसा असतो जो चांगल्या डिटेल्स आणि बॅटरी लाईफ सह येतो.
प्रो टीप: कमी रिजोल्यूशन पेक्षा जास्त रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले जास्त बॅटरी खातो.
HDR वि. Non HDR
फायदा: तुम्ही कधी न पाहिलेले रंग दिसतात.
अर्थ: स्मार्टफोनचा डिस्प्ले किती रंग दाखवू शकतो हे कलर स्पेस वर लपून असते. एखादा चित्रपट चांगल्या पद्दतीने बघता येईल एवढे रंग तर non-HDR फोन्स पण दाखवू शकतात. पण जर तुम्हाला त्याहून चांगला व्हिजुअल एक्सपेरियन्स हवा असेल तर मग तुम्ही HDR एनेबल्ड डिस्प्ले असलेले स्मार्टफोन्स घेऊ शकता ते तुमच्या साठी योग्य ठरतील.
प्रो टीप: HDR डिस्प्लेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी Netflix and Prime Video सारख्या स्ट्रीमिंग सर्व्हिसेस वरील HDR कन्टेन्ट पाहावे लागेल.
रॅम
फायदा: जास्त रॅम = चांगली मल्टि टास्किंग
अर्थ: रॅम म्हणजे काम करणारे हात. जेवढा जास्त रॅम तेवढी जास्त कामं तुमचा फोन एकाच वेळी करू शकेल. स्मार्टफोन मधील रॅम GB मध्ये मोजला जातो. तुम्ही 1GB, 2GB, 3GB, 4GB, 6GB किंवा 8GB इतका प्रचंड रॅम असलेला फोन पण घेऊ शकता.जर तुम्हाला रॅम बाळ अधिक माहित असेल तर खाली आम्ही ती दिली आहे.
1. 1 किंवा 2GB रॅम
2GB किंवा त्यापेक्षा कमी रॅम असलेले फोन्स त्यांच्यासाठी पुरेसे असतात जे आपल्या फोन्सचा वापर कॉल करणे आणि उचलणे या पल्याड करत नाहीत. या फोन्स मध्ये टेम्पल रन सारखे प्रसिद्ध गेम चालणार नाहीत आणि यात मल्टि टास्किंग करता येणार नाही.
2. 3 किंवा 4GB रॅम
3-4GB रॅम असलेले स्मार्टफोन सोशल मीडिया जास्त वापरणाऱ्या लोकांसाठी, जास्त फोटोज काढणाऱ्यांसाठी आणि विडिओ कन्टेन्ट बघणाऱ्यांसाठी चांगले आहेत. अशा स्मार्टफोन्स मध्ये जा चांगला प्रोसेसर असेल तर तुम्ही यावर थोडीफार गेमिंग पण करू शकता. 3 ते 4GB रॅमअसलेले फोन्स मल्टि टास्किंग पण चांगल्या पद्धतीने करू शकतात. तुम्ही अनेक ब्राउजिंग विंडोज सोबत ई-मेल आणि मेसेजिंग पण करू शकता.
3. 6GB रॅम
हा रॅम सेगमेंट पावर युजर्ससाठी आहे. त्यांच्यासाठी आहे ज्यांना परफॉमन्स मध्ये विलंब आवडत नाही आणि सर्व काही जलद हवं असता. 6GB रॅम असलेला फोन वरच्या दर्ज्याची परफॉर्मन्स देतो. हा एकाच वेळी हेवी गेमिंग किंवा एकापेक्षा जास्त ऍप्स वापरण्यासाठी, फोटो एडिटिंग साठी, व्हिडिओ प्लेबॅक साठी उपयोगी पडतो.
4. 8GB रॅम
8GB रॅम असलेले काही फोन बाजारात उपलब्द आहेत पण अशा फोनचा काही विशेष वापर वाटत नाही. कारण कोणत्याही परिस्तिथी एवढा रॅम ऍप्स कडून वापरला जात नाही. सध्यातरी 8GB रॅम म्हणजे नुसताच दिखावा असला तरी तुमुळे तुमचा फोन येणाऱ्या भविष्यात पण चालू शकतो.
स्टोरेज
फायदा: जेवढी जास्त स्टोरेज तेवढेच जास्त गेम्स, ऍप्स, इमेजेस आणि व्हिडिओज तुम्ही तुमच्या फोन मध्ये साठवून ठेऊ शकता.
अर्थ: स्मार्टफोन मध्ये डेटा साठवून ठेवण्याच्या क्षमतेला स्टोरेज म्हणतात, स्टोरेज GB मध्ये मोजली जाते. जेवढी जास्त स्टोरेज तेवढा जास्त डेटा तुम्ही तुमच्या फोन मध्ये साठवून ठेऊ शकता. जर तुम्ही खूप जास्त फोटोज आणि गाणी मोबाईल मध्ये साठवून ठेवत असाल तर तुम्ही कमीत कमी 32GB ऑन बोर्ड स्टोरेज असलेला फोन घ्यावा 64GB असेल तर उत्तमच. जर तुम्ही फक्त नातेवाईकांशी टच मध्ये राहण्यासाठी फोन वापरात असला आणि जास्त गेम्स किंवा ऍप्स वापरात नसाल तर तुमच्यासाठी 16GB ऑन बोर्ड स्टोरेज असलेला फोन पुरे आहे.
प्रो टीप: जर तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे जास्त फोटोज घेतात किंवा जास्त गाणी/मुव्हीज/गेम्स डाउनलोड करतात तर तुम्ही नुसताच जास्त स्टोरेज असलेला फोन घेऊन फायद्याचे नाही तर तुम्ही फोन मध्ये मेमरी कार्ड स्लॉट असलेला फोन घेतला पाहिजे.
मिथ बस्टर: जाहिरातीत दाखवलेली स्टोरेज तुम्हाला कधीच मिळत नाही त्यातील काही जागा ऑपरेटिंग सिस्टम आणि प्री लोडेड ऍप्स ने घेतलेली असते. अँड्रॉइड आणि आयओएस मधील सेटीन्ग्स मध्ये स्टोरेज ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही स्टोरेज चेक करू शकता.
एक्सपांडेबल स्टोरेज
फायदा: कमी स्टोरेज पासून सुटका होते.
अर्थ: एक्सपांडेबल स्टोरेज म्हणजे तुमच्या घरात अतिरिक्त खोली जोडण्यासारखं आहे. ज्यामुळे तुम्हाला जास्त जागा मिळते जिथे तुम्ही आजू खूप काही साठवून ठेऊ शकता. जेव्हा तुम्ही एखादे microSD कार्ड तुमच्या फोन मध्ये टाकता तेव्हा तुमची स्टोरेज एक्सपांड होते पण सर्वच स्मार्टफोन्स मध्ये microSD कार्ड स्लॉट नसते. उदाहरणार्थ आयफोन आणि OnePlus 6 मध्ये पण microSD कार्ड स्लॉट नाही आहे याचा अर्थ असा कि या फोन्स मध्ये स्टोरेज वाढवता येत नाही. microSD कार्ड वर ऍप्स इन्स्टॉल करण्याचा सल्ला माही तुम्हला देऊ शकत नाही पण तुम्ही हि अतिरिक्त जागा तुमचे आवडीचे फोटोज, गाणी आणि मुव्हीज साठवून ठेवण्यासाठी वापरू शकता.
प्रो टीप: एखादे MicroSD कार्ड घेण्यापूर्वी तुमचा स्मार्टफोनची कार्ड सपोर्ट करण्याची अधिकतम क्षमता बघा.
बॅटरी
फायदा: जास्त बॅटरी कपॅसिटी म्हणजे तुम्हाला तुमचा फोन जास्त काळ वापरता येईल.
अर्थ: बॅटरी कपॅसिटी mAh मध्ये मोजली जाते जेवढे जास्त mAh तेवढे चांगले. जास्त बॅटरी कपॅसिटी असल्यास तुम्ही तुमचा फोन वारंवार चार्जिंग विना जास्त काळ वापरू शकता. पण तुमची बॅटरी किती काळ टिकेल हे तुमच्या प्रोसेसर, डिस्प्लेचा प्रकार आणि रिजोल्यूशन तसेच रेडिओज च्या वापरावर पण अवलंबून असते. याच घटकांमुळे सारखीच बॅटरी कपॅसिटी असलेले दोन वेगवेगळे फोन्स वेगवेगळी बॅटरी लाईफ देऊ शकतात.
प्रो टीप: जेवढी मोठी बॅटरी तेवढा फोन पण मोठा होणार.
वायरलेस चार्जिंग
फायदा: फोन फक्त टेबल वर ठेऊन चार्ज करता येतो.
अर्थ: काही आधुनिक स्मार्टफोन्समध्ये फोनला पारंपरिक चार्जर मध्ये प्लग न करता चार्ज करण्याची क्षमता असते. तुम्हाला फक्त तुमचा फोन वायरलेस चार्जर वर ठेवायचा आहे त्यांनतर तुमचा आपोआप चार्ज होईल. वायरलेस चार्जरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वायर गायब होतात आणि त्या खोलीभर पसरत नाहीत किंवा पायात अडकत नाहीत.
प्रो टीप: वायरलेस चार्जिंग हि नवी टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे ती तुमच्या फोनला पारंपरिक चार्जर पेक्षा कमी वेगाने चार्ज करते. जर तुम्ही फोन चार्जिंगला ठेऊन तासंतास वाटू बघू शकत असाल तर तुम्ही वायरलेस चार्जिंग वापरू शकता.
फास्ट चार्जिंग
फायदा: काही मिनिटांत तुमचा फोन वापरण्यास तयार करणे.
अर्थ: फास्ट चार्जिंग मुले तुमचा फोन तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर चार्ज होतो. फास्ट चार्जिंग साठी अनेक स्टँडर्ड्स जरी असले तरी ते सर्व तुमच्या फोनच्या बॅटरीला 0 ते 50 टक्के चार्ज वर 30-मिनिटांत नेऊ शकतात. OnePlus चा Dash Charge खूपच वेगवान आहे जो OnePlus 6 ची 3300mAh ची बॅटरी 0 ते 100 टक्के एक तासांपेक्षा कमी काळात चार्ज करतो. Dash Charge फक्त OnePlusपुरत मर्यादित आहे. पण जर तुम्हाला तुमच्या फोन मध्ये फास्ट चार्जिंग हवी असेल तर स्पेसिफिकेशन मध्ये “फास्ट चार्ज.” Qualcomm’s क्विक चार्ज 3.0असे शब्द शोध. हे सध्या सहज मिळणारे फास्ट चार्जिंग स्टँडर्ड्स आहेत.
प्रो टीप: तुमचा फोन रात्रभर चार्जिंगला ठेऊ नका त्यामुळे तुमची बॅटरी खराब होऊ शकते, त्याऐवजी तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये तुमचा फोन चार्ज करू शकता.
प्रोटेक्शन
फायदा: फोन हातातून खाली पडल्या नंतर तुमची स्क्रीन तुटण्यापासून वाचवतो.
अर्थ: डिस्पले नाजूक असतात त्यामुळे स्मार्टफोन निर्माता सुरक्षाच्या दृष्टीने त्यावर काचेचा एका अतिरिक्त थर चढवतात. सध्या Gorilla Glass हि सुरक्षा काच जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये वापरली जाते. काचेचा नवा[उभे जेवढा मोठा आकडा असेल (Gorilla Glass 5 vs. Gorilla Glass 3), तेवढी मजबूत सुरक्षा मिळते. पण Gorilla Glass हि एकमेव सुरक्षा नाही. मॅनुफॅक्चरर्स Asahi Glass किंवा मग “Bonded Glass” असे शब्द पण काच सुरक्षा दर्शवण्यासाठी वापरू शकतात.
प्रो टीप: Gorilla Glass किंवा इतर कोणतीही काच असल्यामुळे तुमच्या फोनला काही होणार नाही अशा भ्रमात राहू नका, फोनची काळजी घ्या.
व्हिज्युअल टीप: दोन स्मार्टफोन बाजूबाजूला ठेवले आणि दोघांवर स्क्रॅच केले तर ज्यावर स्क्रॅच होतील तो कोणतीही सुरक्षा काच नसलेला फोन असेल तर दुसरा फोन “Gorilla Glass ने सुरक्षित” असेल.
डिझाईन
फायदा: चांगल्या डिझाईन मुले फोन फक्त चांगला दिसत नाही तर त्यामुळे तुमचा फोन तुमच्याकडून होणारा छळ पण सहन करू शकतो.
अर्थ: आकार ठरवण्या इतकं स्मार्टफोन डिझाईन करणं सोप्प नाही. स्मार्टफोन डिझाईन करताना लक्षत घेतलेल्या प्रत्येक छोट्या बाबीवर तुमच्या फोनचा वापर आणि टिकाऊपणा अवलंबून असतो. असे बोलतात कि मेटल पाऊण बनलेलं फोन्स प्लॅस्टिक फोन्स पेक्षा चांगले असतात. जर तुम्हाला तुमचा नवीन फोन घेण्याआधी जर स्मार्टफोनच्या डिझाईन विषयी जाणून घायचे असेल तर खाली वाचा.
1. वापरण्यात येणारे मटेरियल
मेटल पासून बनलेलं स्मार्टफोन हे प्लास्टिक किंवा पॉलीकार्बोनेट ने बनेलल्या फोन्स पेक्षा जास्त टिकतात हा नियम आहे. काच हि जास्त टिकाऊ नसते पण तिच्यापासून बनलेले फोन्स जास्त सुंदर दिसतात आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा देतात. पण काचेपासून बनलेले फोन केस मध्ये ठेवावे लागतात. जर तुम्हाला चांगला दिसणारा फोन हवा असेल तर काचेपासून बनलेला फोन घ्या पण मेटल फोन तुमची जास्त आदळआपट सहन करू शकतो.
2. रंग
रंग डिझाईन मधला महत्वाचा भाग आहे कारण बऱ्याच जणांना वाटते कि आपण वापरत असलेले रंग आपलं व्यक्तिमत्व दर्शवतात. गोल्ड, ब्लॅक आणि सिल्वर असे रंग जवळपास सर्वच स्मार्टफोन निर्माते वापरतात पण Huawei, Honor, Samsung आणि OnePlus सारखे ब् या पेक्षाही जास्त रंग घेऊन येतात.
3. एर्गोनॉमिक्स
तुम्ही किती सहज तुमचा स्मार्टफोन वापरता हे फक्त तुमच्या मोठ्या हरणावर अवलंबून नसतं तर तुमच्या स्मार्टफोनच्या आकारावर पण अवलंबून असते. जर तुम्ही एका असा फोन शोधात असाल जो तुम्ही एका हाताने वापरू शकाल तर तुम्ही नव्या 18:9 आस्पेक्ट रेशिओ सह येणार फोन घेऊ शकता.
4. धूळ आणि पाण्यापासून वाचणारे
याला IP रेटिंग्स म्हणतात, बंद न पडता तुमचा फोन किती पाणी सहन करू शकतो हे Ingress Protection रेटिंग्स वरून दर्शिवले जाते. IP68 रेटिंग धूळ आणि पाण्यात बुडण्यापासून सर्वोत्तम सुरक्षा देते, तर IP67,IP66 आणि IP65 मधून तुम्हाला हलका पाऊस आणि अचानक सांडलेल्या पाण्यापासून सुरक्षा मिळू शकते.
कॅमेरा
फायदा: जेवढा चांगला कॅमेरा असेल तेवढे चांगले फोटोज तुम्हाला घेता येतील.
अर्थ: स्मार्टफोन वरील कॅमेरा खूप सुधारले आहेत. आजकाल स्मार्टफोन वरील कॅमेरा हा सर्वात पहिला कॅमेरा बरेच जण वापरतात आणि काही जण तर तेवढाच कॅमेरा एक्सपेरियन्स घेतात. काही लोकांसाठी स्मार्टफोन वरील कॅमेरा फोन निवडताना खूप महत्वाचा मुद्दा असतो. एक चांगला स्मार्टफोन कॅमेरा ओळखण्यासाठी अनेक घटक लक्षात घावे लागतात त्यांची सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे.
रिजोल्यूशन
फायदा: रिजोल्यूशन = डिटेल्स
अर्थ: तुमच्या कॅमेरा मध्ये असलेले पिक्सल्स म्हणजे रिजोल्यूशन. ज्यांना मेगापिक्सल्स म्हटले जाते, ते तुम्हाला हवा असलेला सिन रेकॉर्ड करतात आणि त्याचे सौंदर्य साठवून ठेवतात.
मिथक: जास्त मेगापिक्सल्स = चांगली इमेज
सत्य: बऱ्याच लोकांना वाटते जास्त मेगापिक्सल्स म्हणजे जास्त डिटेल्स पण तसे नाही. स्मार्टफोनच्या सेन्सरला धक्का न लावू देता त्यात पिक्सल्स बसवणायची एक मर्यादा असते. त्यामुळे जास्त मेगापिक्सल्सच्या दाव्याने हरखून जाऊ नका. चांगले फोटो 12-14-मेगापिक्सल्स रिजोल्यूशन असलेल्या सेन्सर ने पण घेता येतात.
लेन्स
फायदा: स्पष्ट इमेज तयार करण्यासाठी.
अर्थ: लेन्स कॅमेरा सेन्सर वर प्रकाश केंद्रित करण्यास मदत करते ज्यामुळे कॅमेऱ्याला वस्तूंवर लक्ष केंद्रित करता येते. जवळपास सर्वच स्मार्टफोन्स मध्ये प्लास्टिक लेन्स असते पण महाग स्मार्टफोन्स मध्ये काचेची लेन्स असते, ज्या प्लास्टिक लेन्स पेक्षा कितीतरी चांगल्या असतात. काही स्मार्टफोन्स वर Zeiss किंवा Leica ब्रॅण्डिंग दिसते, ज्या सर्वोत्तम लेन्सेस आहेत.
अपर्चर
फायदा: तुम्हाला लो लाईट फोटो घेण्यास मदत करतो.
अर्थ: लेन्स उघडण्याच्या आकाराला अपर्चर म्हणतात जे f/1.4 किंवा f/2.0 किंवा f/2.8 आणि पुढे असे लिहिलेले असते. लेन्सच्या अपर्चरची संख्या बघा. जेवढा छोटा अपर्चर असेल तेवढा जास्त प्रकाश कमाईत मध्ये जाईल ज्यामुळे लो लाईट परफॉर्मन्स चांगली होते. उदाहरणार्थ 2.4 अपर्चर पेक्षा 1.8 अपर्चर चांगला असतो आणि त्यापेक्षा चांगला 1.4 अपर्चर असतो.
फोकस मेथड
फायदा: फोकस स्लो असल्यास तुम्हाला जो शॉट घ्यायचा आहे तो तुम्ही गमावू शकता.
अर्थ: फोकसिंग सिस्टम मुले तुमचे फोटो भुरकट येत नाहीत. बाजारातील अनेक फोकसिंग टेक्नोलोजिझ मधील Dual Pixel AF हि नुसतीच वेगवान नसून, साधारण प्रकाशात तसेच लो लाईट मध्ये पण चांगले फोटो काढण्यास मदत करते. Phase Detect Auto Focus, म्हणजेच PDAF हि पण एक चांगली टेक्नॉलॉजी आहे. या दोन्हीपैकी एक फिचर असलेल्या स्मार्टफोनची निवड करावी.
प्रो टीप: कॅमेऱ्याला फोकस करण्यासाठी थोड्या प्रकाशाची गरज असते त्यामुळे जर तुमच्या स्मार्टफोन मध्ये Dual Pixel AF किंवा PDAF नसल्यास तुम्ही तुमच्या सब्जेकट वर थोडा प्रकाश टाकून त्यानंतर फोकस करण्याचा प्रयत्न करू शकता.
स्टेबिलायझेशन
फायदा: कमी प्रकाशात पण स्पष्ट फोटो घेण्यास आणि स्थिर व्हिडीओ घेण्यास मदत होते.
अर्थ: फोटो किंवा व्हिडीओ घेताना कधी कधी तुमचा हात हलू शकतो. अशावेळी ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन मुळे तुमचे फोटो ब्लर होत नाहीत. सध्या ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) हे इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन (EIS) पेक्षा चांगले असल्याचे बोलले जाते,त्यामुळे जर तुमच्यकडे बजेट असेल तर तुम्ही ज्या स्मार्टफोनच्या कॅमेरा मध्ये OIS आहे तो घेऊ शकता.
प्रो टीप: ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन EIS पेक्षा जास्त चांगले चालते, पण दोघांचे कॉम्बिनेशन त्याहून चांगले.
ड्युअल कॅमेरा
फायदा: जास्त कॅमेरा मुळे फोटो मध्ये सुधार येतो आणि तुम्हाला चांगले फोटोज मिळतात.
अर्थ: दोन कॅमेरा दिल्यामुळे तुम्हाला फोटोग्राफीचा वेगळाच अनुभव मिळतो. दुसऱ्या लेन्सच्या प्रकारावरून ड्युअल कॅमेरा फोनचे दोन प्रकार पडतात, एक ज्यात तुम्हाला अतिरिक्त फोकल लेन्थ (टेलीफोटो किंवा अल्ट्रा वाईड) मिळते आणि दुसऱ्यात मोनोक्रोम सेन्सर असतो. ज्या कॅमेरा मध्ये सेकंडरी सेन्सर मोनोक्रोम सेन्सर असतो तो त्या लोकांसाठी योग्य जे लोक ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी करतात.
ट्रिपल कॅमेरा
फायदा: झूम आणि शार्पर इमेज देण्यास सक्षम.
अर्थ: ट्रिपल कॅमेरा तुम्हाला झूम, वाईड अँगल लेन्स आणि ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर मुळे कलात्मक फोटो घेण्याची मुभा देतो. जर तुमचा ड्युअल कॅमेरा आणि ट्रिपल कॅमेरा मध्ये गोंधळ उडाला असेल तर तो याने कमी होऊ शकतो.
पोर्ट्रेट मोड
फायदा: DSLR सारखे पोर्ट्रेट स्मार्टफोन कॅमेरा मधून घेता येतात.
अर्थ: पोट्रेट मोड म्हणजेच बोकेह मोड हा फोटोग्राफीचा असा प्रकार आहे ज्यात माणसाला शार्प फोकस मध्ये ठेऊन बॅकग्राऊंड ब्लर केले जाते. चांगल्या पोट्रेट साठी कॅमेरा मध्ये दोन लेन्सचा सेटअप असावा लागतो जो सॉफ्टवेअर सोबत मिळून उत्कृष्ट पोट्रेट फोटोज देतो. हा फिचर सॉफ्टवेअर अवलंबून असतो त्यामुळे तुमच्या मोबाईल मध्ये कोणताही ड्युअल कॅमेरा सेटअप असो त्याने काहीच फरक पडत नाही. विशेष म्हणजे Google Pixel 2 मध्ये फक्त एकच कॅमेरा असूनदेखील त्यातील सॉफ्टवेअर सर्वोत्तम पोट्रेट फोटोज देतो.
सेल्फी कॅमेरा
फायदा: कोणाचीही मदत न घेता तुम्हाला तुमचा फोटो घेता येतो.
अर्थ: फ्रंट कॅमेऱ्याचे काम फक्त आणि फक्त तुम्हाला चांगले दाखवण्याचे असल्यामुळे त्यांच्यात काही ब्युटिफिकेशन फिचर असतात जे चेहऱ्यावरचे डाग हटवू शकतात आणि तुमचा चेहरा पाहतो मध्ये चमकवू शकतात. जर तुम्हाला फ्रंट फेसिंग कॅमेरा बॅक कॅमेऱ्याइतकाच महत्वाचा वाटत असेल तर फ्रंट फेसिंग कॅमेरा सोबत येणाऱ्या फ्लॅश वर लक्ष असू द्या जो Oppo आणि Vivo फोन्स मध्ये असतो. अनेक स्मार्टफोन्सच्या फ्रंट फेसिंग कॅमेरा मध्ये पण आजकाल पोर्ट्रेट मोड असतो जो एक चांगला अतिरिक्त फिचर आहे.
प्रो टीप: कधी कधी ब्युटिफिकेशन मोड मुले तुमची स्क्रीन प्लॅस्टिकची झाल्यासारखी वाटते त्यामुळे हा मोड वापरताना सेटीन्ग्सची काळजी घ्या.
व्हिडीओ मोड्स
अर्थ: आठवणी मौल्यवान असतात त्यामुळे तुम्हाला त्या जेवढ्या चांगल्या पद्धतीने कॅप्चर करता येतील तेवेढे चांगले. आपल्याला फक्त हाय रिजोल्यूशन मधील विडिओ हवे असतात, त्याही पेक्षा इतर अनेक घटक असतात ज्यांच्यावर स्मार्टफोनची व्हिडीओ रेकॉर्डिंग अवलंबून असते.
रिजोल्यूशन
फायदा: जास्त रिजोल्यूशन = शार्प, स्पष्ट विडिओ
अर्थ: व्हिडीओ 4K, 1080p आणि 720p मध्ये रेकॉर्ड करता येतो. जास्त रिजोल्यूशन असेल तर तुम्ही तो विडिओ मोठ्या स्क्रीनवर तेवढ्याच चांगल्या क्वालिटीने बघता येतो.
प्रो टीप: जेवढ्या जास्त रिजोल्यूशनचे व्हिडीओ रेकॉर्ड कराल तेवढीच फोन मधील स्टोरेज पण वापरली जाईल त्यामुळे त्यावर पण लक्ष असू द्या.
फ्रेम रेट
फायदा: जास्त फ्रेम रेट = सहज प्लेबॅक
अर्थ: फ्रेम रेट म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करताना एका सेकंदात कॅप्चर होणारे फोटोज. व्हिडीओ म्हणजे काय तर अनेक फोटो एकत्र करून ते वेगाने चालवले जातात. कमीत कमी फ्रेम रेट 24 फ्रेम्स पर सेकंड (किंवा 24fps) असतो आणि जो 60 fps पर्यंत जाऊ शकतो. खूप वेगवान घटना रेकॉर्ड करताना हाय फ्रेम रेट उपयोगी पडतो. उदाहरणार्थ जर तुम्ही वेगाने घडणारी घटना 60fps आणि 24 fps मध्ये रेकॉर्ड केली, तर 60fps वाला विडिओ 24fps वाल्या विडिओ पेक्षा खूप सहज आणि स्मूथली चालेल. कारण एकाच हायर फ्रेम रेट्. यात आणि स्लो मोशन व्हिडीओ मध्ये गोंधळून जाऊ नका त्याविषयी आम्ही खाली सविस्तर माहिती दिली आहे.
स्लो – मो किंवा स्लो मोशन
फायदा: वेळ जणू मंदावली आहे असे वाटणारे व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात.
अर्थ: सुपर स्लो मोशन व्हिडीओ म्हणजे 180, 240 किंवा कधी कधी 960 fps एवढ्या हाय फ्रेम रेट वर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ, त्यात आपली कृती मंदावते ज्यामुळे आपल्या तो क्षण जरा जास्त काळ अनुभवता येतो. तुम्ही तुमच्या घरात फिरणाऱ्या तुमच्या पाळीव प्राण्याचे किंवा पडणाऱ्या पाण्याचे स्लो मोशन विडिओ घेऊ शकता.
ऑपरेटिंग सिस्टम
फायदा: तुम्हाला तुमचा फोन वापरून किती आनंद मिळतो हे तुम्ही निवडलेल्या ऑपरेटिंग सिस्टम वर अवलंबून असते
अर्थ: जवळपास सर्वच स्मार्टफोन्स एकतर अँड्रॉइड वर चालतात किंवा आयओएस वर चालतात. अनेक अँड्रॉइड फोन्स चांगले चांगले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फीचर्स देत आहेत. थिम ठेवणे किंवा मर्जीनुसार ऍप्स आयकॉन ठेवणे अशा फंक्शन सह कस्टम अँड्रॉइड फोन्स येतात पण त्यांच्यासाठी चांगला प्रोसेसर आणि जास्त रॅम पण लागतो. जर तुम्हाला चांगली परफॉर्मन्स हवी असेल तर तुम्ही स्टॉक अँड्रॉइड सह येणारे फोन्स वापरू शकता ज्यात Google Pixel किंवा Nokia स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
प्रो टीप: स्टॉक अँड्रॉइडचा तो व्हर्जन आहे जो तुमच्या फोनला एक वर्षाच्या वापरानंतर पण स्लो करत नाही.
कस्टम अँड्रॉइड UI
फायदा: स्टॉक अँड्रॉइड मध्ये नसणारे एक्सट्रा फीचर्स मिळतात.
अर्थ: Google स्टॉक अँड्रॉइडचा वापर करतो पण Huawei, Samsung आणि इतर अनेक मॅनुफॅक्चरर स्टॉक अँड्रॉइडला कस्टमाईझ करतात. आणि याच मुळे Huawei च्या वर्जनला EMUIआणि Samsung च्या वर्जनला Samsung Experience म्हटले जाते. इतर अनेक मॅनुफॅक्चरर पण याच मार्गाचा अवलंब करून स्टॉक अँड्रॉइड मध्ये नसणारे फीचर्स देण्याचा प्रयत्न करतात. या फीचर्स मध्ये थीम बदलणे, कस्टम आयकॉन्स ठेवणे यांचा समावेश असू शकतो. पण कस्टम अँड्रॉइड जास्त रॅम आणि प्रोसेसिंग पावर वापरतो.
अँड्रॉइड गो
फायदा: आता लो एन्ड डिव्हाईसेस वर पण सहज पणे अँड्रॉइड वापरता येईल.
अर्थ: 1GB पेक्षा रॅम असणाऱ्या फोन्स साठी गूगल ने अँड्रॉइडचे एक हलके व्हर्जन आणले आहे. याची खासियत म्हणजे हा लेटेस्ट अँड्रॉइड ओरिओ सह येतो आणि अँड्रॉइडचा तोच अनुभव कमी पावरफुल फोन्सवर पण देतो. लो एन्ड अँड्रॉइड वर सहज चालावा म्हणून या OS मध्ये अँड्रॉइडच्या फुल वर्जन प्रमाणे स्लिक ऍनिमेशन नाही. 1GB पेक्षा कमी रॅम असणाऱ्या फोन्स वर चालण्यासाठी अँड्रॉइड गो डिजाईन करण्यात आला आहे त्यामुळे हे वर्जन असणारे फोन्स Rs 8000 पेक्षा कमी किंमतीती उपलब्द आहेत.
अँड्रॉइड वन
अर्थ: ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी गूगल ने अँड्रॉइड वन प्रोग्रॅमची सुरवात केली आहे. यातील OS थोडा हलका हाये जेणेकरून तो फक्त पावरफूल डिव्हाईसेस वर चालणार नाही तर इतर सर्व डिव्हाईसेस वर पण चालेल.
प्रो टीप: 1GB पेक्षा कमी रॅम असणाऱ्या फोनसाठी अँड्रॉइड गो आहे तर अँड्रॉइड वन असलेल्या फोन्समध्ये त्यापेक्षा जास्त रॅम असू शकतो.
सिक्युरिटी
फायदा: तुमच्या खाजगी आयुष्यावर लक्ष ठेऊ पाहणाऱ्या लोकांना दूर ठेवता येते.
अर्थ: तुमच्या फोन मध्ये घुसू पाहणाऱ्या लोकांना दूर ठेवण्यासाठी आजकाल अनेक पर्याय आहेत ज्याने तुम्ही तुमचा फोन लॉक करू शकता. कंपन्या रोज फोन अनलॉक करण्याच्या नवनवीन पद्धती अनंत आहेत पण त्या सर्व तेवढ्याच सुरक्षित असतीलच असे नाही. विशेष म्हणजे तुम्ही दिवसातून अनेकदा फोन अनलॉक करता काही लोक तर शेकडो वेळा फोन अनलॉक करतात. त्यामुळे असा फोन निवडावा जो अनलॉक करणे सोप्पे असेल मग त्यात बोट लावणे असो व पासवर्ड टाईप करणे असो किंवा मग फोन चेहर्या जवळ नेणे असो. खाली आम्ही मार्केट मध्ये उपलब्द असलेल्या सर्व अनलॉकिंग फीचर्सची माहिती दिली आहे.
फिंगरप्रिंट सेन्सर
फायदा: स्मार्टफोन अनलॉक करण्याचा सर्वात जास्त सुरक्षित आणि वेगवान वेगवान मार्ग.
अर्थ: तुमच्या बोटांच्या ठश्यांनी फोन अनलॉक करता येतो. हि सध्या उपलब्द असलेल्या सर्व पद्धतींमधील फोन अनलॉक करण्याची सुरक्षित पद्धत आहे कारण हि तुमच्या बोटांच्या ठश्यातून येणारे इलेक्ट्रिक सिग्नल्स मोजते. फिंगरप्रिंट स्कॅनरला फसवणे कठीण आणि खर्चिक आहे जे एखाद्या सामान्य माणसाला जमणार नाही. फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या मागच्या बाजूला किंवा समोर असू शकतो, दोन्ही तेवढेच सहज वापरता येतात. सध्या अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरवात होत आहे जे जुन्या फिंगरप्रिंट सेन्सर प्रमाणे अचूक आणि जलद नाहीत.
फेसआयडी/फेस अनलॉक
फायदा: फोन अनलॉक करण्यासाठी फक्त तुमचा फोन उचलावा लागतो.
अर्थ: काही फोन्स कडे नुसते बघितल्यास ते अनलॉक होतात. त्यासाठी ते तुमचा चेहरा स्कॅन करतात. फेसआयडी ऍप्पल पूर्ती मर्यादित आहे पण OnePlus, Vivo, Oppo सारखे ब्रॅण्डस तोच रिजल्ट मिळवण्यासाठी इतर वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. फेस अनलॉक वापरायला सोप्पा आहे पण फिंगरप्रिंट स्कॅनर इतका सुरक्षित नाही.
प्रो टीप: माहिती आहे कि तुम्ही फोन कडे नुसते बघून तो अनलॉक करू शकता पण जोवर हि टेक्नॉलॉजी सुरक्षित होत नाही तोवर त्यावर अवलंबून न राहिलेले बरे.
कनेक्टिव्हिटी
अर्थ: स्मार्टफोन्स आपल्याला आपल्या नातेवाईकांशी आणि प्रियजनांशी जोडण्यासाठी बनले आहेत. मग ते कॉल्स, टेक्सटिंग किंवा इमेज आणि व्हिडीओ शेरिंगच्या माध्यमातून असो. स्मार्टफोन मध्ये आजकाल अनके छोटे छोटे मार्ग असतात ज्यातून तुम्ही मेसेज मिळवू शकता किंवा मित्रांना तसेच सोशल मीडिया वर मेसेज पाठवू शकता. ब्लूटूथ प्रमाणे आता ड्युअल सिम स्मार्टफोन्स उपलब्द झाले आहेत. खाली कनेक्टिव्हिटी शी संबंधित घटकांची माहित दिली आहे ती नक्की वाचा.
1. ड्युअल सिम वि. हायब्रीड सिम
जर तुम्ही दोन सिम कार्ड्स वापरत असाल तर तुम्ही ड्युअल सिम स्मार्टफोन निवडू शकता. पण काही स्मार्टफोन्स मध्ये हायब्रीड सिम स्लॉट असतो ज्यात SIM 2 स्लॉट microSD कार्ड सोबत जागा शेअर करतो. याचा अर्थ असा कि तुम्ही एकतर दुसरे सिम वापरू शकता किंवा microSD कार्ड. जर तुम्हाला दोन्ही सिम कार्ड आणि microSD कार्ड वापरायचे असेल तर तुम्हाला असा फोन शोधावा लागेल ज्यात तीन वेगळे डेडिकेटेड स्लॉट्स असतील.
व्हिजुअल टीप: लिंक
2. ड्युअल VoLTE
व्हॉइस ओव्हर LTE किंवा VoLTE ने व्हॉइस क्वालिन्ग क्षेत्रात क्रांती घडवली आहे. हि सेवा Reliance Jio आणि देशाच्या काही भागांमध्ये Airtelकडून दिली जाते, जर तुम्ही Jio आणि Airtel दोन्हीचे सिम्स वापरत असाल तर तुम्हला ड्युअल VoLTE ची गरज भासेल जेणेकरून तुमचा कोणताही सिम बंद होणार नाही. स्मार्टफोन मध्ये ड्युअल VoLTE सपोर्ट आहे कि नाही हे स्मार्टफोनच्या स्पेक्स शीट वरून समजेल.
व्हिज्युअल टीप: जर स्मार्टफोन दोन्ही सिम्स वर 4G चे चिन्ह दाखवत असेल तर तो फोन ड्युअल VoLTE सह येतो.
3. निअर फिल्ड कम्युनिकेशन किंवा NFC
NFC हा ब्लूटूथ ने दोन फोन जोडण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे. जर दोन फोन्स मध्ये NFC असेल आणि ते एकमेकांच्या जवळ आले तर तुम्हाला पेअर करायचे आहे का असे विचारण्यात येईल. यामुळे ब्लूटूथ स्पिकर्स आणि इतर ब्लूटूथ डिव्हाईस सोबत सहज पणे पेअर करता येते. यामुळे ब्लूटूथ पेअरिंग साठी खटाटोप करावा लागत नाही.
4. ऑडिओ जॅक
3.5mm हेडफोन जॅक हा ऑडिओ जॅकचा गोल्ड स्टॅंडर्ड आहे पण आजकाल स्मार्टफोन्स मधून हा पोर्ट गायब होत चालला आहे. अनेकजण स्मार्टफोन बारीक करण्याच्या हेतूने हेडफोन जॅक फोन मधून काढून टाकत आहेत आणि त्याजागी बॉक्समध्ये USB-C टू 3.5mm कन्व्हर्टर देत आहेत. जर तुमच्याकडे हेडफोन आणि इअरफोनचे कलेक्शन असेल किंवा तुम्हाला कन्वर्टरचा खटाटोप कार्याचा नसेल तर तुम्ही 3.5mm हेडफोन जॅक असलेला स्मार्टफोन घेऊ शकता.
प्रो टीप: USB-C टू 3.5mm हेडफोन जॅक युनिव्हर्सली कम्पॅटिबल नाही आहे. एका फोनचा कन्वर्टर दुसऱ्या फोन सोबत वापरता येईलच असे नाही त्यामुळे USB-C ऑडिओ ट्रेंड कडे जाताना याचाही विचार करा.