digit zero1 awards

Vivo चा Affordable स्मार्टफोन Amazon वरून आणखी स्वस्तात खरेदी करा, बघा अप्रतिम ऑफर्स। Tech News 

Vivo चा Affordable स्मार्टफोन Amazon वरून आणखी स्वस्तात खरेदी करा, बघा अप्रतिम ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo चा बजेट स्मार्टफोन Vivo T2X 5G वर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत.

हा फोन ऑफर्ससह तुम्हाला Amazon वरून खरेदी करता येईल.

क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 850 रुपये इतका डिस्काउंट

अलीकडेच लाँच झालेल्या Vivo चा बजेट स्मार्टफोन Vivo T2X 5G वर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्ससह तुम्ही हा बजेट स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. हा फोन ऑफर्ससह तुम्हाला Amazon वरून खरेदी करता येईल. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर आणि EMI चा लाभ घेता येणार आहे. जाणून घ्या फोनची किंमत आणि उपलब्ध डील्स-

Vivo T2X 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo T2X स्मार्टफोन Amazonवर 18,999 रुपये या MRP सह उपलब्ध आहे. मात्र, साईटवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटसह हा स्मार्टफोन 14,727 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. ही या स्मार्टफोनच्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. एवढेच नाही तर, यावर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.

VIVO BUDGET SMARTPHONE OFFERS

ऑफर्सबद्दल बोलायचे झल्यास, तुम्ही हा स्मार्टफोन EMI ऑप्शनसह 714 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यावर नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. बँक ऑफर्समध्ये क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 850 रुपये इतका डिस्काउंट मिळेल. तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरसह 13,800 रुपयांची सूट मिळवू शकता. येथून खरेदी करा

Vivo T2X 5G

Vivo T2x 5G मध्ये 6.58 इंच लांबीचा FHD + डिस्प्ले आहे. Vivo ने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर दिला आहे. यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य सेन्सर आणि 2MP सेकंडरी सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झल्यास, मोबाईल फोनमध्ये 5G, ड्युअल सिम, ब्लूटूथ, GPS आणि USB Type-C पोर्ट दिले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo