Amazon Great Indian Festival Sale 2023 लवकरच होणार सुरु, लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळेल प्रचंड Discount 

Amazon Great Indian Festival Sale 2023 लवकरच होणार सुरु, लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळेल प्रचंड Discount 
HIGHLIGHTS

Amazon India ने Great Indian Festival Sale 2023 ची घोषणा केली आहे.

अधिकृत सेल बॅनरनुसार, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल लवकरच सुरू होईल.

लेटेस्ट सेलमध्ये मोबाईल फोनवर 40% पर्यंत डिस्काउंट मिळण्याची शक्यता

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. Amazon India ने अधिकृतपणे त्याच्या आगामी फेस्टिवल सेल म्हणजेच Great Indian Festival Sale 2023 ची घोषणा केली आहे. यासह Amazon ने ही सेल प्रमोट करायला देखील सुरुवात केली आहे. अधिकृत सेल बॅनरनुसार, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल लवकरच सुरू होईल. त्याबरोबरच, प्राइम सदस्यांना या सेलचा लाभ इतर सदस्यांपेक्षा लवकर घेता येणार आहे. वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार, Amazon Great Indian Festival Sale 2023 सेल 10 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Great Indian Festival Sale 2023 दरम्यान ‘या’ ऑफर्स मिळतील

Amazon ने त्याच्या आगामी सेलबद्दल अधिक तपशील उघड केलेले नाहीत. मात्र, Amazon ने SBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी 10% सवलतीची पुष्टी केली आहे. याशिवाय, लेटेस्ट सेलमध्ये मोबाईल फोनवर 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार असल्याचेही समोर आले आहे.

सेलच्या लँडिंग पेजनुसार, ग्राहक लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, स्मार्ट टीव्ही, उपकरणे आणि अलेक्सा डिव्हाइसेसवर 75% पर्यंत सूट ऑफरची अपेक्षा करू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Amazon इंडियाने आगामी सेलसाठी Samsung आणि इंटेलसह पार्टनरशिप केली आहे. यावरून समजते की, ग्रेट इंडियन फेस्टिव्हलदरम्यान इंटेल प्रोसेसरवर चालणाऱ्या सॅमसंग प्रोडक्ट्स आणि कॉम्प्युटरवर आकर्षक डिल्स आणि डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे.

‘या’ प्रोडक्ट्सवर मिळेल जबरदस्त डिस्काउंट

Great Indian Festival Sale 2023 दरम्यान ग्राहक स्मार्टफोन, लॅपटॉप आणि घरगुती उपकरणे यांसारख्या अनेक उत्पादनांवर मोठ्या सवलतीची अपेक्षा करू शकतात. Amazon च्या या आगामी सेल दरम्यान, OnePlus 11, Samsung Galaxy S23 आणि Motorola Razr 40 Ultra सारख्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत मिळण्याची शक्यता आहे.

Amazon Great Indian Festival Sale 2023

याव्यतिरिक्त सेल दरम्यान इच्छुक ग्राहक नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज डील सारख्या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, iPhone 13 आणि iPhone 14 सिरीज मॉडेल्ससारख्या Apple च्या अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या ऑफर आणि डिस्काउंट देखील अपेक्षित आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo